बंगळूरू हे शहर स्टार्टअप आणि बिझनेस हब म्हणून ओळखले जाते. प्रत्येक व्यवसायामध्ये इथे स्पर्धा आहे मग तो मोठा असो की छोटा. येथे प्रत्येक दुकानाचे नाव ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी स्पर्धा करते. आता या यादीमध्ये एक नवीन स्पर्धक उदयास आला आहे, जो सध्या चर्चेत आला आहे. सोशल मीडियावरबंगळूरूमध्ये एका दुकानाच्या नावाचा फोटो व्हायरल होत आहे. हा एका चाटच्या दुकानाच्या नावाचा फोटो आहे. दुकानाचे नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते, तुम्हाला हसूही येऊ शकते कारण दुकानेच नावच चक्क एक्स गर्लफ्रेंडच्या आठवणीत ठेवले असावे. इतकेच नाही तर ब्रेकअप झाल्यानंतर लोक येथे आवर्जून येतात.

‘एक्स गर्लफ्रेंड बांगरपेठे चाट’ असे या दुकानाचे नाव आहे. हे केवळ प्रसिद्ध चाट पदार्थांचा आनंद घेण्याचे ठिकाण नाही तर ब्रेकअपनंतरच्या थेरपीसाठी बंगळुरूमधील नागरिकांचे आवडते ठिकाण आहे. फर्रागो मेटिकिरके(@dankchikidang) यांनी हा फोटो एक्स वर शेअर केला आहे. या शॉपमध्ये तुम्हाला असा हटके मेन्यू देखील आहे. ब्रेकअपच्या समस्यांवर आधारित हा मेन्यू पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. येथे तुम्हाला स्वादिष्ट पदार्थ खायला देखील मिळतील आणि ब्रेकअपनंतर सांत्वना देखील मिळते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – “आईचा जागर!” तरुणाने साडी नेसून केले जोगवा नृत्य; Viral Video पाहून अंगावर येईल काटा

हेही वाचा – थंडीपासून वाचण्यासाठी हटके जुगाड! सायकलच्या सीटमध्ये टाकले जळत्या लाकडाचे तुकडे; Video एकदा बघाच…

ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी लोक येथे आवर्जून येतात.येथील चाट पदार्थांचा आनंद घेतात. तुम्ही जर तुमच्या नात्याबाबत दुखी असाल तर ‘एक्स गर्लफ्रेंड बंगारपेट चाट’ ला भेट द्या. नात्यातील कडू आठवणी विसरून जा. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदाने भन्नाट युक्ती लढवली आहे जी लोकांना प्रचंड आवडली आहे. सोशल मीडियावर या दुकानाच्या पोस्टरची चर्चा होत आहे.

Story img Loader