रशिया आणि युक्रेनदरम्यान अद्याप युद्ध सुरूच आहे. रशियाचे सैन्य सातत्याने पुढे येत असून ते युक्रेनची राजधानी कीवच्या जवळ पोहचले आहे. दोन्ही देशांमधील तणाव संपवण्यासाठी अनेक देश मध्यस्थीसाठी पुढाकारही घेत आहेत. गेल्या महिन्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी क्रेमलिन येथे पुतिन यांची भेट घेतली. दोघांच्या भेटीदरम्यान लोकांचे लक्ष ते ज्या टेबलावर बसले होते त्याकडे वेधले गेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बैठकीदरम्यान पुतिन आणि मॅक्रो १२ मीटर लांब टेबलच्या दोन टोकांवर बसलेले दिसले. पुतिन यांचा हा टेबल इटलीतील एका छोट्या फॅमिली फर्मने तयार केला आहे. या कुटुंबाने क्रेमलिनसाठी डझनभर फर्निचर डिझाइन केले आहे. पुतिन यांच्या ज्या पांढऱ्या टेबलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्याबद्दल या टेबलचे उत्पादक रेनाटो पोलोग्नाने सांगितलं की १९९५-१९९६ दरम्यान त्यांच्या ओक फर्मला मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टनुसार क्रेमलिनला हा टेबल पुरवण्यात आला होता.

खेळांमधून हद्दपार केल्यानंतर आता मनोरंजन बंदी!; रशियासंदर्भात Disney, Sony Picturesचा मोठा निर्णय

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी रॉयटर्सला सांगितले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या प्रकृतीची जाणीव ठेवून इतक्या दूर बसण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी त्यांनी हे टेबल निवडले.

काय आहे या टेबलचे वैशिष्ट्य?

हे टेबल बीच वुडच्या एकाच लाकडापासून बनवले आहे, त्याला आधार देण्यासाठी त्याच्या खाली तीन स्टँड बसवले आहेत. हे टेबल सुशोभित करण्यासाठी, त्याच्या कडांना सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. पांढर्‍या रंगाच्या टेबलावर सोनेरी रंग अतिशय आलिशान दिसत आहे. जर एखाद्याला या अमूल्य टेबलचा वापर करून आपल्या आलिशान घराचे सौंदर्य वाढवायचे असेल तर त्याला ते खरेदी करण्यासाठी सुमारे १००,००० युरो खर्च करावे लागतील.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is more talk of vladimir putin table than of the russia ukraine war pvp