Optical Illusion IQ Test : ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि माणसांच्या बुद्धीला चालना देतात. रोजच्या धावपळीच्या जीवनामुळे माणसांची वैचारिक गुंतागुंत झालेली असते. पण ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो माणसांची वैचारिक क्षमता वाढवतात. आताही इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोमुळे इंटरनेटवर ही टेस्ट पास होण्यासाठी जणूकाही स्पर्धाच लागली आहे. कारण या फोटोत खार असल्याचं दिसत आहे. पंरतु, फोटोत खार नसून वेगळाच प्राणी लपला आहे. फोटोत नेमका कोणता प्राणी आहे? हे शोधण्यासाठी तुम्हाला फक्त ५ सेकंदांचाच वेळ मिळणार आहे. कारण ज्यांच्याकडे तल्लख बुद्धी आणि तीक्ष्ण नजर आहे, अशीच माणसं या फोटोत लपलेला प्राणी शोधू शकतात.
फोटोत खार नाही, मग कोणता प्राणी आहे, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धीचा कस लावावा लागेल. ज्यांनी बुध्दीचा योग्य प्रकारे वापर केला असेल, अशा माणसांना फोटोत लपलेला प्राणी शोधणं शक्य झालं असेल. मात्र, ज्या लोकांनी फोटोत बारकाईने पाहिला नसेल त्यांना या फोटोत खारच दिसली असेल. ज्या लोकांनी फोटोत खार लपली आहे, असं उत्तर दिलं असेल, तर ते चुकीचं आहे. कारण या फोटोत खार नसून एक घोडा असल्याचं दिसत आहे. ५ सेकंदाच्या आत ज्यांनी या फोटोत लपलेला घोडा शोधला असेल, त्या सर्वांचं अभिनंदन. फोटोत असलेला घोडा शोधण्यासाठी कसं डोकं लावलं, हे तुम्ही प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगू शकता.
इथे पाहा फोटोत लपलेला घोडा
हा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो इतक्या जबरदस्त पद्धतीने तयार करण्यात आला आहे की, या फोटोत समोरून पाहिल्यावर खार असल्यासारखं दिसतं. परंतु, फोटो फिरवून पाहिल्यावर तो एक घोडा असल्याचं स्पष्ट होतं. ज्यांच्याकडे गरुडासारखी तीक्ष्ण नजर आहे, त्यांना पाच सेकंदाच्या आता फोटोत घोडा असल्याचं समजलं असेल. पण ज्या लोकांनी त्यांच्या बुद्धीला चालना दिली नसेल, त्यांना या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये अपयश आलं असेल. पण ज्यांनी फोटो अचूकपणे फिरवला असेल, त्यांना खारच्या ऐवजी एका घोड्याचं डोकं दिसलं असेल.