बाप आणि लेकीचं नातं अत्यंत खास असते. प्रत्येक मुलीचा आपल्या वडीलांवर आणि प्रत्येक वडीलांचे मुलीवर जीवापाड प्रेम असते. लेक जन्मल्यापासून सासरी जाईपर्यंत वडील तिला फुलांसारखे जपतात. वडीलांनी केलेल्या प्रत्येक कष्टाची जाण लेकीला कायम असते. वडीलांसाठी कोणतीही गोष्ट करताना मुलींना खूप आनंद होतो मग वडीलांची काळजी घेणे असो किंवा त्यांच्यासाठी जेवण बनवणे असो. वडीलांना लेकीने केलेल्या प्रत्येक कामाचे कौतुक असते. सध्या अशाच बाप- लेकीच्या सुंदर नात्याचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
रितू दासगुप्ताने इन्स्टाग्रामवर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एका कुटुंबातील सुंदर क्षण कैद झाला आहे जो पाहिल्यानंतर सोशल मिडिया वापरकर्ते बोलणे थांबवू शकत नाहीत.
क्लिपची सुरुवात रितू तिच्या वडीलांना उत्सुकतेने विचारते, “बाबा, मी तुमच्यासाठी पहिल्यांदा जेवण बनवले आहे. तुम्हाला ते आवडले का?” त्यांची प्रतिक्रिया मजेशीर आहे.
मी माझ्या आयुष्यात सर्व काही मिळवले आहे. हे अन्न इतके चांगले आहे की देवी अन्नपूर्णा स्वतः स्वर्गातून अवतरल्यासारखे वाटते, ” अशी मजेशीर प्रतिक्रिया ते देतात आणि घरातील सर्वजण खळखळून हसतात.
हेही वाचा – “मॅम, मला हात लावू नका”, दारूच्या नशेत महिलेने कॅब चालकाला मारले, आरडा ओरडा करत केला तमाशा, Viral Video
आनंदी दिसणारी रितू वडीलांच्या कौतुकाची अतिशयोक्ती कमी करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते,” नाही. ते इतके चांगले नव्हते.”
रितु पहिल्यांदा वडीलांना जेवण बनवल्याबद्दल भेटवस्तू म्हणून ५ हजार रुपये मागते त्यावर वडील तिला पुढच्या वर्षी याच दिवशी देतो असे सांगून मजेत तिची विंनती टाळतात.
व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,(वडील म्हणून) त्यांनी खूप हाय स्टँडर्ड सेट केले आहेत.
हेही वाचा – काय सांगता? पाणीपुरी विक्रेत्याने कमावले तब्बल ४० लाख! ऑनलाईन पेमेंट्स पाहून आयकर विभागाने पाठवली GST नोटीस
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर…
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया त्वरीत व्यक्त केल्या. एका वापरकर्त्याने शेअर केले, “हे मला त्या दिवसाची आठवण करून देते जेव्हा मी माझी पहिली आर्धी कची आणि अर्धी करपलेली विचित्र आकाराची चपाती बनवली होती. माझे कुटुंब माझ्यावर हसले, पण माझ्या वडिलांनी आनंदाच्या अश्रूंनी त्या सर्व चपात्या खाल्ल्या, ‘आज जिंदगी सफल हो गई.’म्हणणारे बाबा खरोखरच सर्वोत्तम चीअरलीडर्स आहेत!”
ही गोड व्हिडिओ वडील आणि मुलगी यांच्यातील अतूट नाते दर्शवते.