Viral Video : असं म्हणतात, “मदतीचा हात जेव्हा दिला जातो, दुःखाचा दरिया थोडा हलका होतो.” गरजूला मदत करणे, हे खूप मोठे पुण्य असते. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात ज्यामध्ये अनेक लोक गरजूंना मदत करताना दिसतात.

काही व्हिडीओ खूप काही शिकवणारे असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका दिव्यांग व्यक्तीला एका माणसाने दुचाकीच्या मदतीने सायकल पुढे ढकलण्यास मदत केली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल की जगात अजूनही माणूसकी शिल्लक आहे. माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे आणि प्रत्येकाने अशी माणुसकी निभवायला पाहिजे, असे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून वाटेल. (these are rich people a man Helping a disabled person with the help of bike video goes viral)

याला म्हणतात श्रीमंत लोक!

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक रस्ता दिसेल. रस्त्यावर वाहने ये जा करताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला एक दिव्यांग व्यक्ती सायकलवर बसून जाताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक माणूस त्या दिव्यांग व्यक्तीला दुचाकीच्या मदतीने सायकल पुढे ढकलण्यास मदत करत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ पिरंगुट पुलाजवळील असून ही दिव्यांग व्यक्तीसायकल हाताने हाकत होती पण सायकल पुढे जात नव्हती तेव्हा एका व्यक्तीने त्यांना दुचाकीच्या मदतीने पुढे जाण्यास मदत केली. या व्हिडीओवर लिहिलेय, “मदतीचा हात तेच देतात, जे मनाने श्रीमंत असतात”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

sonerimulshi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पिरंगुट पुलाजवळ एक दिव्यांग व्यक्ती सायकल हाताने हाकत होता, परंतु सायकल काही चढाने चढत नव्हती. जाणारे हजारो पण असतील, पण त्यातील या व्यक्तीने त्याला अशा पद्धतीने मदत केली”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी हार्टेचे इमोजी शेअर केले आहेत. यापूर्वी सुद्धा असे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. माणुसकीचे दर्शन घडवणारे हे व्हिडीओ पाहून नेटकरी अनेकदा कौतुकाचा वर्षाव करतात. अशा व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्स वर्षाव करतात.

Story img Loader