7 places in India to see snowfall in December : डिसेंबर महिना संपत आला असून, अनेकांनी वर्षाच्या या शेवटच्या महिन्यात फिरण्याचे प्लॅन आखले आहेत. अनेकांनी कुठे जायचे हे ठरवलेही असेल. दरवर्षी अनेक पर्यटक डिसेंबरच्या शेवटी हिमाचल, उत्तराखंड व काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टीचा आनंद लुटण्याचा प्लॅन करतात. पण, आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत; जिथे तुम्ही बर्फवृष्टीचा पुरेपूर आनंद लुटू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डिसेंबरमध्ये फिरण्यासाठी ‘ही’ आकर्षक ठिकाणे

१) मनाली

हिमाचल प्रदेशाची शान म्हणून मनाली हे ठिकाण ओळखले जाते. दरवर्षी लाखो लोक डिसेंबर महिन्यात बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी मनालीत येतात. मनालीतील बर्फाच्छादित शिखरे आणि देवदारची झाडे येथे येणाऱ्या पर्यटकांना एक वेगळाच आनंद देतात.

२) धर्मशाला

हिमाचल प्रदेशातील आणखी एक सुंदर ठिकाण म्हणजे धर्मशाला; जो कोणी येथे येतो, तो येथील दऱ्याखोऱ्या आणि सौंदर्य बघून स्वत:ला हरवून बसतो. ट्रायंड ट्रेकसोबत येथे होणारा हिमवर्षाव येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालतो.

३) धनौल्टी

उत्तराखंडमध्ये वसलेल्या धनौल्टीचे सौंदर्य शब्दांत व्यक्त करता येणे अशक्य आहे. दरवर्षी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि देशभरातील अनेक भागांतून हजारो पर्यटक हिमवर्षावाचा आनंद घेण्यासाठी येथे येत असतात.

४) औली

उत्तराखंडतील औली हे एक वेगळेच ठिकाण आहे. येथे सर्वत्र बर्फाच्छादित उंच शिखरे आहेत आणि येथे होणाऱ्या हिवाळ्यातील साहसी उपक्रमांचा आनंद घेण्याला पर्यटक पहिली पसंती दर्शवितात.

हेही वाचा – फिरायला जाण्यासाठी हॉटेल रूम बुक करताय? मग जरा थांबा, आधी ‘हा’ VIDEO पाहा, मग करा बुकिंग

५) गुलमर्ग

काश्मीर खोऱ्यातील या अतिशय सुंदर ठिकाणाला जन्नत, असेही म्हटले जाते; जिथे तुम्हाला पृथ्वीवर स्वर्गाचा आनंद घेता येतो.

६) शिमला

हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला या ठिकाणाला ‘पर्वतांची राणी’, असेदेखील म्हटले जाते. येथे देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी येतात.

७) मसुरी

दिल्लीपासून अवघ्या सात तासांच्या अंतरावर वसलेले उत्तराखंडचे हे हिल स्टेशन पर्यटकांची पहिली पसंती आहे. आल्हाददायक हवामान, उंच शिखरे आणि मॉल रोडवरुन दिसणारे डेहराडून शहराचे दृश्य अनेकांना वेगळीच अनुभूती देते.