तो गोरागोमटा नाही, ना उंच, ना अभिनेत्यासारखे त्याच्याकडे पिळदार शरीर आहे पण तरीही बांगलादेशी तरूणींच्या हृदयावर तो राज्य करतो. त्याची प्रसिद्धी इतकी आहे की मुली त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तासन् तास वाट पाहतात. या तरूणाचे नाव आहे अलोम बोगरा. बांगलादेशचा ‘सुपरस्टार’ म्हणून तो ओळखला जातो.
Viral : या चीनी गर्लने नेटीझन्सना केले घायाळ, सोशल मिडियावर फोटो व्हायरल
अलोम बोगरा हा बांगलादेशमधला अभिनेता आणि मॉडेल आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे फोटे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनेक मुलींसोबत सेल्फी घेतानाचे ते फोटो होते. अनेक जुन्या गाण्यांचे व्हिडिओ बांगला भाषेमध्ये रेकॉर्ड करून तो व्हिडिओ बनवतो. हे व्हिडिओ युट्यूबवर आणि सोशल मीडियावर अपलोड केले जातात. हे व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच हिट होतात. त्यामुळे अलोमचे चाहते लाखो आहेत. मुली त्याच्यासोबत एक सेल्फी काढण्यासाठी तासन् तास रांगेत उभ्या राहतात. असे त्याच्याबद्दल अनेक किस्से ऐकिवात आहेत.
वाचा : जाणून घ्या सोशल मीडियावर व्हायरल झालेली भाजीवाली आहे तरी कोण?
त्यातला मीरपूर येथील ‘शेर-ए-बांगला’ स्टेडिअमवर झालेला एका किस्स्याची खूपच चर्चा झाली. क्रिकेटचा सामना बघण्यासाठी हजारो क्रिकेटप्रेमी आले होते. अलोमही तेथे पोहचला होता. तेव्हा तर अनेकांनी त्याला घेरून त्याच्यासोबत सेल्फी काढले होते. अलोम बोगरा याचे बालपण गरिबीत केले. त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. त्यामुळे शाळा सोडून अलोम हा सीडी आणि कॅसेट्स विकायचा. यातून त्याला महिन्याला तुटपुंजी रक्कम मिळायची. २००८ मध्ये पहिल्यांदा त्याने आपला म्युझिक व्हिडिओ बनवला आणि तो चालवत असलेल्या केबल नेटवर्कवर प्रसिद्ध केला. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ युट्यूबवरही अपलोड केला, तेव्हापासून अलोम हा खूपच प्रसिद्ध होत गेला.