गणरायाच्या आगमनाचे वेध सर्वांनाच लागले आहेत. कधी एकदा गणपती बाप्पा घरी येतात असे प्रत्येक भक्ताला वाटत आहे. दरम्यान घरोघरी गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी पुणेकर तयारीला लागलेले आहे. सजावटीचे सामान आणि फुलांनी बाजारपेठा गजबजल्या आहे. पुणेकरांची देखील खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाप्पासाठी पुणेकर दरवर्षी उत्साहाने सुंदर सजावट करतात मग तो गणपती घरचा असो की मंडळाचा. कित्येक जण सुंदर देखावे तयार करतात, कधी सुंदर फुलांची आरास करतात तर कधी झगमगत्या लाइट लावतात. पुण्यातील मंडळासह कित्येकांच्या घरातील गणपतीच्या स्वागातासाठी केलेली सजावट पाहण्यासारखी असते. आज आम्ही तुम्हाला पुण्यातील अशा पाच ठिकाणांबाबत सांगणार आहोत जिथे तुम्हाला विविध प्रकारच्या सुंदर मखर, लाइटच्या माळा, सजावटीचे सर्व सामान आणि वेगवेगळी सुंदर फुले मिळतील तेही किफायतीशीर किंमतीमध्ये. चला तर मग जाणून घेऊ या कोणती आहेत ही ठिकाणे.

१. बोहरी अळी – बुधवार पेठ
बुधवार पेठेतील बोहरी अळीमध्ये विशेषत: सजावटीसाठी लागणाऱ्या सुंदर वस्तू, रांगोळी, त्याचे विविध रंग, रांगोळीचे छाप आणि लाइटच्या माळा तुम्हाला मिळतील. विशेष तुम्हाला सुंदर मखर देखील किफायतीशीर किंमतीमध्ये येथे उपलब्ध आहेत.

हेही वाचा – Shree Krishna Janmashtami 2023 : नक्की केव्हा साजरी होईल कृष्ण जन्माष्टमी, ६ की ७ सप्टेंबर? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त, आणि महत्त्व

२. महात्मा ज्योतिबा फुले मंडई
महात्मा ज्योतिबा फुले मंडईं ही सर्वानांचा माहित आहे येथे बारा महिने ग्राहकांची गर्दीही असतेच. पण गणेशोत्सवापूर्वी मंडईमध्ये पुणेकरांची पावले आवर्जून वळतात. कोणतेही पुजेचे साहित्य असो ( हळद, कुंक, कापूर, वाती, रांगोळी इतर), कोणत्याही प्रकारचे फुलं असो, नारळ असो की मिठाई सर्व काही तुम्हाला येथे खरेदी करता येते.

हेही वाचा – “आमच्या पप्पांनी गणपती आणला”; चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून तुम्हीही व्हाल त्याचे चाहते,पाहा व्हायरल व्हिडिओ

३. तुळशीबाग
महिलांचे खरेदीचे आवडते ठिकाण म्हणजे तुळशीबाग. तुम्हाला सजावटीसाठी कोणतेही साहित्य हवे असो किंवा सुंदर दिवे असोत की लाइटच्या माळा हव्या असोत येथे तुम्हाला सर्व काही मिळते. या बाजारपेठेत गौरी पुजनासाठी लागणारे साहित्य देखील मिळते. तसेच गौरी गणपतीचे सुंदर मुखवटे, वस्त्र,अंलकार देखील खरेदी करता येतात.

४. तपकिर गल्ली
तपकिर गल्लीला पुण्यात लाइटिंग मार्केट म्हणून ओळखले जाते. येथे तुम्हाला विविध प्रकारच्या लाइटच्या माळा किफायतीशीर किंमतीमध्ये मिळतात. तसेच सुंदर लॅम्प असो की, सजावटीसाठी कोणतेही लाइटिंगचे साहित्य असतो सर्व काही येथे मिळते.

हेही वाचा – Festivals in September 2023 : कृष्ण जन्माष्टमीपासून गणेश चतुर्थीपर्यंत; येथे पाहा सप्टेंबरमधील महत्त्वाच्या सण-उत्सवांची संपूर्ण यादी

५. रविवार पेठ :
पुण्यातील होलसेल मार्केट (घाऊक बाजार) म्हणून रविवार पेठ ओळखली जाते. येथे तुम्हाला कोणतीही वस्तू स्वस्त दरात मिळू शकते मग ते कपडे असो की सजावटीचे साहित्य असो की इतर काही. गौरी-गणपतीच्या पुजेपासून सजावटीसाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य येथे तुम्हाला हमखास मिळेल.

गणरायाच्या स्वागतासाठी तुमचे खरेदी अजून झाली नसेल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These places in pune are famous for puja and decorative materials to welcome the beloved bappa snk
Show comments