Delhi Pollution News दिल्लीतील हवेची गुणवत्ता खूपच घसरली आहे. हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर प्रदूषणाचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. ज्यात प्रदूषणकारी ट्रक, व्यावसायिक चारचाकी वाहने आणि राजधानीतील सर्व बांधकाम उपक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. कमिशन ऑन एअर क्वालिटी मॅनेजमेंटने तयार केलेल्या अहवालानुसार केंद्राच्या वायू प्रदूषण नियंत्रण योजनेमध्ये दिल्लीतील प्रदुषणाचा आकडा कमी करण्यासाठी ही पावले उचलली गेली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन दिवस शाळा बंद

राजधानी दिल्लीत काही क्षेत्रामध्ये प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. अनावश्यक बांधकाम आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. परंतु अद्याप दिल्ली आणि NCR राज्यांमधून सर्व आपत्कालीन उपायांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. अनेक भागात हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने ४०० चा टप्पा ओलांडला आहे. याच पार्श्वभूमीवर काही भांगामध्ये दोन दिवस शाळाही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धोकादायक प्रदूषणापासून मुलांचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नात दिल्ली सरकारने सर्व प्राथमिक शाळा दोन दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> फुकट तिथे प्रकट! भजी खाण्यासाठी तुटून पडले लोक; उकळत्या तेलातून काढल्या भजी, VIDEO व्हायरल

लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास वाढू शकतो

लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास वाढू शकतो असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. अनेक भागात हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने (AQI) ४०० चा टप्पा ओलांडला आहे. शहराचा एक्यूआय गुरुवारी दुपारी ३ वाजता ३७८वर तर बुधवारी २४ तासांचा सरासरी एक्यूआय ३६४, मंगळवारी ३५९, सोमवारी ३४७, रविवारी ३२५, शनिवारी ३०४, शुक्रवारी २६१. – लहान मुले आणि वयोवृद्धांमध्ये अस्थमा आणि फुप्फुसांच्या समस्या वाढू शकतात, असा अंदाज आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thick haze covers delhi schools shut as air quality remains severe delhi pollution news video srk