चोरट्यां उच्छाद दिवसें-दिवस वाढत चालला आहे. मोबाईल, दागिने, रोकड चोरीच्या अनेक घटना समोर येत आहे. अनेकदा या चोरीच्या घटना सीसीटिव्हीमध्ये कैद होतात आणि सोशल मीडियावर चर्चेता विषय ठरतात. काही दिवसांपूर्वीच एका सोनाराच्या दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या चोरट्याने भरदिवसा चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान आता अशाच एका सोन्याची चैन चोरणाऱ्या चोरट्याचा धक्कादायक व्हिडीओ चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये दुचाकीवरील महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचून चोरटा पळ काढताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये दुचाकीवर बसलेले कुटुंब दिसत आहे. दुचाकीवर दोन मुले आणि एक पुरुष आणि सर्वात शेवटी बसलेली दिसत आहे. महिला दुचाकीवर बसून निघणार तेवढ्यात मागून एक चोरटा दबक्या पावलांनी चालत त्यांच्या जवळ येतो आणि महिलेच्या गळ्यातील चैन हळूच खेचून घेतो. महिलेला काहीतरी खेचल्याचे जावणते त्यामुळे ती झटकन पुढे सरकून गाडीवरून खाली उतरते. तोपर्यंत चोरटा गळ्यातील सोनसाखळी ओढून पळ काढतो. महिला त्याला पकडण्यासाठी मागे धावण्याचा प्रयत्न करते पण तोल जाऊन ती जमिनीवर पडते. काही समजण्याआधी चोरटा पळून जातो. चोरट्याला पकडण्यासाठी महिला जोर-जोरात आरडा करते. दुचाकीवरील माणूस मुलांना खाली उतरवून चोरटा ज्या दिशेला गेला त्या दिशेला दुचाकी घेऊन जातो. महिलेचा आवाज ऐकून जमा झालेले लोकांपैकी एक जण देखील त्याच दिशेने जातो. इतर लोक तिथे बघ्याची भूमिका घेऊन पाहात राहतात. व्हिडीओ पाहून लोकांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. सुदैवाने दुचाकी सुरु झाली नव्हती अन्यथा सोन चैन चोरट्यामुळे महिलेचा मोठा अपघात झाला असता.

bike thief shocking video viral
तुम्ही बाईक बिनधास्त कुठेही पार्क करताय? चोर अवघ्या सेकंदात अशी करतायत बाईकची चोरी; धक्कादायक VIDEO पाहाच
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
What Happened Used Onion And Chutney In Hyderabad Amritsar Haveli Restaurant Shocking Food Video
हॉटेलमध्ये उष्ट्या कांदा आणि लोणच्याचं काय होतं माहितीये? VIDEO पाहून तुमच्याही पायाखालची जमिन सरकेल
ladies group dance on marathi song Bai Mi Patang Udvit Hote marathi old song video goes viral
“गं बाई मी पतंग उडवीत होते” महिलांनी मकरसंक्रांतीला काळ्या साड्या नेसून केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकाल
Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
cab driver viral video
VIDEO : टॅक्सी चालकाला पोहोचायला ७ मिनिटांचा उशीर, महिलेने घातला राडा; चालकाच्या अंगावर थुंकत म्हणाली…
Shocking Viral Video Scooter rider drag a man for 1 km
बाईकस्वाराने भररस्त्यात ओलांडली क्रूरतेची मर्यादा! वृद्धाला स्कुटीला बांधत फरपटत नेलं अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
True love Viral Video
‘बायको, तू फक्त साथ दे..’ खऱ्या प्रेमाचं उदाहरण दाखविणारा सुंदर VIDEO एकदा पाहाच…

हेही वाचा – लग्न मंडपात भटजींना सांगितला WIFEचा अर्थ, जो ऐकून नवरा-नवरीला आवरेना हसू, पाहा मजेशीर Viral VideO

हेही वाचा – अविश्वसनीय! ब्रह्मपुत्रानदीमध्ये उतरला हत्तींचा कळप, खोल पाण्यात पोहणाऱ्या हत्तींचे दुर्मिळ दृश्य, पाहा Viral Video

इंस्टाग्रामवर sirsakiaawaz नावाच्या खात्यावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ” काही क्षणातच त्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढला.” व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, “अशा घटनांमुळे मुलांच्या मनात धास्ती निर्माण होते.” दुसऱ्याने लिहिले,”महिलांनी आजच्या काळात सावध राहण्याची आवश्यकता आहे”

Story img Loader