एखाद्या बँकेच्या एटीएमवर दरोडा पडला, एटीएम मशीन फोडून चोरांनी डल्ला मारला या आणि अशा अनेक बातम्या वरचेवर आपल्याला पहायला, वाचायला मिळत असतात. मात्र तामिळनाडूमध्ये एक फारच चमत्कारिक घटना घडलीय. एटीएम लूटण्याच्या इराद्याने आलेल्या चोरावर हा चोरीचा प्लॅन असा काही उलटला की तो पोलिसांच्या तावडीत सापडला.  नामाक्कल जिल्ह्यामधील अनियापूरम येथे मागील गुरुवारी हा सर्व प्रकार घडला. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एटीएम मशीन फोडून चोरी करण्यासाठी आलेला हा चोर चक्क एटीएम मशीनमध्येच अडकला.

नक्की वाचा >> ‘बचपन का प्यार’मुळे रातोरात स्टार झालेल्या सहदेवला MG ने गिफ्ट केली २३ लाखांची कार?

एटीएम मशीनमध्ये अडकल्याने पकडलेल्या या चोराचं नाव एम उपेंद्र रॉय असं आहे. उपेंद्र हा बिहारमधील चंपारणमधील आहे. २८ वर्षीय उपेंद्रला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र ही अटक करण्याआधी पोलिसांना त्याची सुटका करावी लागली. पडलात ना गोंधळात. पण हे खरं आहे. झालं असं की एटीएम मशीनच्या मागील बाजूला असणारं प्लायवूड तोडून या चोराने एटीएममध्ये प्रवेश केला. मात्र तो बरोबरच एटीएम मशीन ज्या ठिकाणी होतं तेथील भाग होता. त्यामुळे या चोराने दगडाच्या सहाय्याने मशीनचा मागील भाग मोकळा केला. मात्र या खटपटीमुळे एटीएम असणाऱ्या इमारतीमधीलन नागरिकांना काहीतरी गोंधळ असल्याची शंका आली आणि त्यांनी पोलिसांना कळवलं.

नक्की वाचा >> मका आणि सोयाबीनच्या मोबदल्यात टोयोटा फॉर्च्यूनर; कंपनीची शेतकऱ्यांसाठी विशेष ऑफर

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तेव्हा हा चोर एटीएम मशीन आणि भिंतीच्यामध्ये अडकलेल्या अवस्थेत कोणाच्या तरी मदतीची वाट पाहत असल्याचं दिसून आलं. समोरचं दृष्य पाहून क्षणभर पोलीसही चक्रावून गेल्याचं पहायला मिळालं. या चोराचा छातीच्या वरील भाग हा एटीएमची स्क्रीन असते तिथून बाहेर आला होता तर बाकीचं शरीर मात्र एटीएम मशीनमध्ये अडकलं होतं. हा प्रकार पाहून पोलीसही गोंधळात पडले तर काहींना हसू आवरलं नाही. नंतर चौकशीमध्ये प्लायवूड फोडून आत आल्याने हा गोंधळ झाल्याचं समोर आलं. पोलिसांनी या चोराची सुटका केली आणि त्याला ताब्यात घेतल्याचं टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. पोलिसांनी या चोराला अटक करुन दुसऱ्या दिवशी न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नामाक्कल तुरुंगामध्ये त्याला ठेवण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> बर्थडे पार्टी कुत्र्याच्या वाढदिवसाची… मालकाने खर्च केले तब्बल तीन लाख रुपये

सोशल नेटवर्किंगवर अनेकदा अशाप्रकारेच एटीएम फोडण्यासाठी गेलेल्या आणि चुकून पासबुक प्रिटिंग मशीन चोरलेल्या चोरांचा फोटो व्हायरल होत असतो. हा व्हायरल फोटो २०१६ मधील असून ही घटना गुवहाटीमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बिनोबानगर येथील एटीएममध्ये घडली होती. एटीएम मशीन समजून चोरांनी चुकून पासबूक प्रिटींग मशीन चोरलं होतं. हा फोटो अनेकदा व्हायरल होताना दिसतो. या बातमीमुळे पुन्हा एकदा अनेकांना या पासबुक मशीन चोरणाऱ्यांची आठवण झालीय. अनेकदा हा फोटो चोरी करण्यासाठीही अक्कल असावी लागते अशा मजकुरासहीत सोशल नेटवर्कींगवर मिम्सच्या पेजकडून शेअर होताना दिसतो.

Story img Loader