रेल्वे प्रवासादरम्यान अनेकदा अंगावर काटा आणणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी कोणी रेल्वेच्या दरवाज्यात उभे राहून स्टंटबाजी करताना तर कोणी धावत्या रेल्वेच्या छतावरून धावताना दिसतात. कधी जीव मुठी घेऊन खचाखच भरलेल्या रेल्वेच्या दरवाज्याला लटकून प्रवासी प्रवास करताना दिसतात तर खिडकीतून प्रवाशींचे मोबाईल चोरणारे चोरटे दिसतात. काही चोरीच्या घटनांमध्ये तर प्रवाशांनी चोरट्याला खिडकीत चोरी करताना रंगेहाथ पकडले आणि धावत्या रेल्वेच्या खिडकीत लटकवत नेले. असे व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो पण तरीही चोरटे चोरी करणे मात्र सोडत नाही. अशाच एका चोरट्याचा नवा व्हिडिओ समोर आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका धक्कादायक व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला ट्रेनच्या खिडकीतला लटकताना दिसत आहे. ट्रेन सुसाट वेगाने धावते आहे पण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कसलीच भीती दिसत नाही जणू हे त्याचे रोजचे काम आहे.
येथे पाहा Viral Video
इन्स्टाग्रामवर एका ट्रॅव्हल इन्फ्लुएंसरने रेकॉर्ड केलेल्या या घटनेने सोशल मीडिया वापरकर्ते थक्क झाले आहेत. या दृश्याचे शुटींग करणाऱ्या इन्फ्लुएंसरने त्या व्यक्तीला “चोर” म्हटल्याचे ऐकू येत आहे. तसेच हा “चोर” कानपूरचा आहे असेही सांगितले.
व्हिडीओच्या सुरुवातीला हा चोरटा शांतपणे खिडकीमध्ये लटकत आहे पण अशा परिस्थितीमध्येही तो काहीतरी खाण्याचा प्रयत्न करत आहे. तो एका हाताने सीटला पकडले आहे आणि दुसऱ्या हाताने काहीतरी खाताना दिसत आहे. चोरच्याला आपल्या जीवाची काहीच पर्वा नाही हे दिसत आहे. तो ज्या पद्धतीने लटकत आहे आशा स्थितीत त्याची एक चूक झाली तर तो आपला जीव गमावू शकतो याची जाणीवही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही.
व्हिडिओमध्ये इन्फ्लुएंसरने दावा केला आहे की, ट्रेन धावत असताना हा चोर एका तासाहून अधिक वेळ खिडकीमध्ये लटकून होता. व्हिडिओचे कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”आयुष्यावर प्रेम नाही”
या फुटेजमध्ये ट्रेनमधील इतर प्रवासीही त्या माणसाच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ शुट करताना दिसत आहेत. या व्हिडिओला ३५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
२०२२ मध्ये बिहारमध्ये नोंदवलेल्या अशाच एका प्रकरणात, मोबाईल फोन चोरण्याच्या प्रयत्नात पकडल्यानंतर एका चोर चालत्या ट्रेनमध्ये लटकताना दिसला होता.