दिवसेंदिवस चोरट्यांनी धुमाकूळ घातला असल्याचं चोरीच्या घटनांच्या माध्यमातून समोर येत आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी लोकांना प्रत्येक वेळी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. पोलिसांनाही चोरट्यांना पकडण्यासाठी विशेष तपास मोहीम राबवावी लागते. कारण चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेले चोरटे नेहमीच पळ काढण्याचा प्रयत्न करतात. पण एका चोरट्याला गव्हाच्या पिठाच्या गोणी चोरताना चांगलीच अद्दल घडली आहे. ट्रकमध्ये असेलेल्या गव्हाच्या गोणी चोरण्याचा चोरट्याचा प्रयत्न चालकासोबत असलेल्या हेल्परने हाणून पाडला आहे. चोरट्याला चालकाच्या हेल्परने पकडून थेट ट्रकच्या बोनेटला बांधून त्याची धिंडच काढली. या चोरट्याला ट्रकला बांधून थेट पंजाबच्या मुक्तसार जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. हा सर्व थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणाबाबत पंजाब मुक्तसारच्या पोलीस उप अधीक्षकांनी एएनआयनं दिलेली माहिती अशी की,” या चोरीच्या घटनेचे दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. चोरटा ट्रकमध्ये गव्हाच्या गोणी चोरताना एका व्हिडीओत दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत चालकाने त्या चोरट्याला ट्रकच्या बोनेटला बांधल्याचं दिसत आहे. चालक आणि त्याच्या हेल्परने चोरट्याला बोनेटला बांधून थेट पोलीस स्टेशनला आणले.”

नक्की वाचा – Video: इंग्रजी शिकायला गेली अन् विद्यार्थीनीने ४२ वर्षीय शिक्षकासोबत प्रेमाचेच धडे गिरवले, थेट मंदिरातील व्हिडीओ झाला व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

चोरट्याचा चोरीचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या ट्रक चालकाने त्याला बोनेटला दोरीने बांधले आणि थेट पोलीस स्टेशनच्या दिशेनं रवाना झाले. चोरट्याला दोरीने बांधून ठेवलं आणि बोनेटजवळ चालकाचा हेल्पर असल्याचंही या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. गंगादीप सिंग नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. चोरट्यांचा चोरी करण्याचा प्लॅन फसल्यानंतर त्यांना लोकांनी विचित्र प्रकारची अद्दल घडवल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियवार व्हायरल झाले आहेत.