Viral video: सोशल मीडियाचे जग मजेदार व्हिडीओंने भरलेले आहे. दररोज हजारो लाखो व्हिडीओ येथे पाहिले आणि अपलोड केले जातात. त्यांपैकी काही खरोखरच खूप मजेदार असतात जे आपलं मनोरंजन करतात. म्हणून मग आपण त्यांना सारखेसारखे पाहतो, एवढेच काय तर आपण आपल्या मित्रांना देखील पाठवतो आणि या व्हिडीओंचा आनंद लूटतो. बेरोजगारीमुळे जगभरातील तरुणाई चुकीच्या मार्गावर जाताना दिसत आहे. यात गरीबी, उपासमार आणि अशिक्षितपणामुळे अनेक तरुण गुन्हेगारी मार्गावर वळताना दिसत आहेत. यामुळे चोरी, लुटमार, दरोडासारख्या घटना घडताना दिसतात. अशाच एका अनोख्या चोरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये चोरी करण्यापूर्वी चोरानं केलेलं कृत्य पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

चोरीची एक अजब घटना समोर आली आहे. इथे चोरी करण्यापूर्वी चोराने जे काही केलं, ते पाहून सगळेच थक्क झाले. दरम्यान चोर असला तरी तो माणूसच नाही का…अशा या चोरानं चोरी करण्यापूर्वी दुकानाबाहेरच योगा केला आहे. दुकानं फोडण्यापूर्वी हा चोर योगा करताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा चोर चोरी करण्यासाठी दुकानाबाहेर आला मात्र त्यानं थेट दुकानात न जाता. दुकानाबाहेरच बसून वेगवेगळ्या प्रकारे योगा करायला सुरुवात केली. या चोरानं अक्षरश: जमिनीवर बसून तर कधी उभे राहून योगा केला आहे. यानंतर चोर दुकानात गेला अन् चोरी करुन पसार झाला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: बापाचं काळीज! लबाड लांडगा २ वर्षाच्या चिमुकल्याची करत होता शिकार; पुढे वडिलांनी जे केले ते पाहून बसेल धक्का

सोशल मीडियावर एका चोराने चोरी केल्याचा व्हिडीओ इंटरनेटच्या जगात व्हायरल झाला आहे. हा मजेदार व्हिडीओ आतापर्यंत शेकडो वेळा पाहिला गेला आहे आणि मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी त्याला पसंत देखील केला आहे. हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे. एका नेटकऱ्यानं म्हंटलंय “चोर असला तरी तो शेवटी माणूसच”, तर दुसऱ्या वापरकर्त्यानं म्हंटलंय की, “पैशांपेक्षा शरीर जास्त महत्वाचं आहे.”

Story img Loader