Apologise For Stealing Laptop: ट्विटर वापरकर्ता झ्वेली_थिक्सोने एका चोराकडून मिळालेला ईमेल शेअर केला आहे. ज्याने त्याचा लॅपटॉप चोरला होता. त्या चोराने त्याचाच मेल वापरून चोरीबद्दल माफी मागून, सांगितले की तो आपले पोट भरण्यासाठी संघर्ष करत आहे. यावेळी त्याने लॅपटॉप मालकाला गरज पडल्यास त्याच्या फाईल्स पाठवण्याचीही तयारी दाखविली. लॅपटॉप चोरी झालेल्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘त्याने काल रात्री एका चोराने माझा लॅपटॉप चोरला आणि माझ्या ईमेलचा वापर करून मला ईमेलही पाठवला, आता माझ्या मनात संमिश्र भावना आहेत.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लॅपटॉप चोरल्यानंतर माणसाने ईमेल लिहिला

चोराने पाठवलेल्या ईमेलमध्ये लिहिले होते, ‘कसा आहेस भाऊ, मला माहित आहे की मी काल तुझा लॅपटॉप चोरला. मला पैशांची गरज होती कारण मी माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत होतो. मी पाहिले की तुम्ही एका संशोधन प्रस्तावात व्यस्त आहात, मी ते मेलसोबत जोडले आहे आणि जर तुम्हाला आणखी काही फाइल्स हव्या असतील तर तर कृपया मला सोमवार बारा वाजेपूर्वी अलर्ट करा कारण मला क्लायंट मिळाला आहे. पुन्हा एकदा माफी मागतो भाऊ. ईमेलच्या विषयामध्ये चोराने लिहिले की, ‘लॅपटॉप चोरीबद्दल माफ करा.’

( हे ही वाचा: नवरीला मागे बसवत नवऱ्याने हवेत उडवली फिल्मी स्टाईल बाईक; जगावेगळे प्री-वेडिंग फोटोशूट पाहण्यासाठी हा Viral Video एकदा पाहाच)

( हे ही वाचा: अस्वलाच्या क्रोधापुढे वाघाची झाली पळताभुई; जंगलातील थरारक लढाईचा ‘हा’ Viral Video एकदा पहाच)

पोस्ट पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या

इंटरनेट वापरकर्त्याने लॅपटॉप चोरणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूती व्यक्त केली. एका युजरने लिहिले की, ‘हा माणूस खूप गरजू दिसतो आणि जर कोणी त्याला नोकरीची ऑफर दिली तर तो कदाचित ते काम करेल. एखाद्याचा संशोधनाचा प्रस्ताव किती महत्त्वाचा आहे हे त्याला माहीत आहे. यामुळे त्याने ते ईमेलद्वारे परत केले. त्याच्याशी बोलले पाहिजे आणि लॅपटॉप परत करण्यासाठी पैसे ऑफर केले पाहिजे. आणखी एका यूजरने एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने लॅपटॉप चोरला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thief sent email after stealing the laptop people surprise gps
Show comments