Shocking video: मोबाईल कोण वापरत नाही? सगळेच वापरतात. मोबाईल वापरण्याचं प्रमाण जसं वाढलं, तसंच मोबाईलरांचंही प्रमाण वाढलं. कुणाच्या मोबाईलवर चोरटे कुठे, कधी हात टाकतील याचा काही नेम नाही. अशातच एक चोरीचा व्हिडीओ समोर आलाय. पण, व्हिडीओ पाहताना नेमकी चोरी झाली कुठे हे पहिल्यांदा पाहिल्यानंतर कळणारच नाही. त्यासाठी व्हिडीओ पुन्हा स्लो-मोशनमध्ये पाहावा लागतो. तेव्हा जाऊन कळतं, की नेमकी चोरी कशी, कोणत्या मिनिटाला केली गेली. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही इथून पुढे मोबाईल वापरताना सतर्क राहाल.
सोशल मीडिया हे व्हिडीओ आणि फोटोंचं भांडार आहे,. येथे तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. कारण- येथे अशी एकही गोष्ट नाही; जी तुम्हाला इथे सापडणार नाही. सोशल मीडिया उघडताच आपल्यासमोर वेगवेगळ्या गोष्टींची दालनं खुली होत जातात. त्यामधून पुढे पुढे जाताना आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे; जो पाहून आपल्या लक्षात येईल की, आपल्या आजूबाजूला काय घडत आहे आणि त्यामुळे आपल्याला सतर्क राहण्याची कशी गरज आहे.
काही कळायच्या आत मोबाईल लंपास
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी रस्त्याच्या कडेला एका दुकानाबाहेर उभी आहे. यावेळी रस्त्यावरून बरेच लोक ये-जा करताना दिसत आहेत. ही तरुणी या ठिकाणी कुणाच्या तरी येण्याची वाट पाहत असल्याचं दिसत आहे. यावेळी अचानक एक तरुण दुचाकीवरून येतो आणि तिच्या हातातला मोबाईल हिसकावून घेऊन जातो. व्हिडीओ पाहताना हा चोर नेमका कुठून येतो आणि नक्की काय करतो हे कळत नाही; मात्र पुढच्याच क्षणी हा चोर तरुणीचा मोबाईल हिसकावून पळाला आहे हे लक्षात येतं. ही तरुणी चोराच्या मागे धाव घेते; मात्र तो चोर दुचाकीवर असल्यामुळे सुसाट निघून जातो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> पार्क केलेल्या कारचा दरवाजा अचानक उघडला, तो चुकवायला गेला अन् पुढे जे घडलं ते मन विचलित करणारं; Video व्हायरल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर @Deady Kalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. त्यासोबतच अनेकांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिलेय की, अशा प्रकारे त्याचे दोन फोन चोरीला गेले आहेत. एकाने व्हिडीओच्या आधारे तक्रार करावी, अशी सूचना केली. व्हिडीओमध्ये चोरट्याचा चेहरा दिसत आहे. अशा स्थितीत तो पकडला जाणे अपेक्षित आहे. आमच्यासोबतही अशीच घटना घडल्याची तक्रार अनेकांनी केली.
हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणून आपल्यासमोर आला आहे. त्यामुळे या व्हिडीओत या तरुणीनं जशी बेसावध राहण्याची चूक केली, तशी चूक तुम्ही करू नका. एकंदरीत सार्वजनिक ठिकाणी नेहमी सावधगिरी बाळगा.