मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मोठी गर्दी असते. त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये अनेकदा चोरीच्या घटना घडतात. लोकलमधील गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांच्या वस्तूंवर डल्ला मारतात. म्हणूनच लोकलमधून प्रवास करताना अनेकजण मोबाईल चोरी जाणार नाही, याची काळजी घेत असतो. मात्र चोर आता नवनवीन आयडीया शोधून काढतात, खिडकीजवळ दरवाजाजवळ बसलेल्या प्रवाशांचे मोबाईल हे चोर सराईतपणे हिसकावून चोरी करतात. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे. तुम्हीही प्रवासादरम्यान ट्रेनच्या खिडकी किंवा दरवाजाजवळ मोबाईल वापरत असाल तर सावधान!
चालत्या लोकलमधून मोबाईल चोरी
आजच्या काळात मोबाईल फोन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. सगळेच मोबाईलमध्ये व्यस्थ असतात, मोबाईल फोन हा टाईमपासचे चांगले साधन बनले आहे.विशेषत: ट्रेन किंवा बसने प्रवास करताना मोबाईलमुळे वेळ कसा निघुन जातो कळत नाही. बंगळुरूहून चेन्नई सेंट्रलला जाणाऱ्या वृंदावन एक्स्प्रेसमध्ये हा व्हिडिओ कैद झाला आहे. बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीने ट्रेनमधून जाणाऱ्या प्रवाशाचा फोन हिसकावून घेतला. त्याच्या मागे बोगीत उभा असलेला प्रवासी दरवाजाबाहेरचे दृश्य रेकॉर्ड करत होता. दरम्यान, चोरीची ही घटना त्याच्या मोबाईलमध्येही कैद झाली आहे. चालत्या ट्रेनमधून मोबाईल हिसकावल्याचा हा व्हिडिओ लोकांना आश्चर्यचकित करत आहे.
ट्रेनमधून मोबाईल चोरीच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. चोर चालत्या ट्रेनमधून फोन किंवा पर्स चोरण्यासाठी खिडकी किंवा दारात उभ्या असलेल्या प्रवाशांनाच लक्ष्य करतात. या व्हिडिओमध्येही बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीने दरवाजा किंवा खिडकीत कोण मोबाइल वापरत आहे हे पहिले. त्याचा अंदाज घेत त्याने मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीच्या हातातून मोबाईल हिसकावला. ट्रेन चालू असल्याने चोरही निवांत होता.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: शॉर्टकटच्या नादात अंगावरून अख्खी ट्रेन गेली अन्…; हृदय हेलावणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
लोकांनी त्यांचे अनुभव सांगितले
हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. यासोबतच अनेकांनी त्यावर कमेंटही केल्या. एका व्यक्तीने लिहिले की अशा प्रकारे त्याचे दोन फोन चोरीला गेले आहेत. तर एकाने व्हिडिओच्या आधारे तक्रार करावी, अशी सूचना केली. व्हिडिओमध्ये चोरट्याचा चेहरा दिसत आहे. अशा स्थितीत तो पकडला जाणे अपेक्षित आहे. त्यांच्यासोबतही अशीच घटना घडल्याची तक्रार अनेकांनी केली.