Viral video: रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढल्या आहेत. चोर रेल्वे स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत चोऱ्या करतात. लोकल ट्रेनमध्ये मोठी गर्दी असते. त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये अनेकदा चोरीच्या घटना घडतात. लोकलमधील गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांच्या वस्तूंवर डल्ला मारतात. म्हणूनच लोकलमधून प्रवास करताना अनेकजण मोबाईल चोरी जाणार नाही, याची काळजी घेत असतो. मात्र चोर आता नवनवीन आयडीया शोधून काढतात, खिडकीजवळ दरवाजाजवळ बसलेल्या प्रवाशांचे मोबाईल हे चोर सराईतपणे हिसकावून चोरी करतात. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे. तुम्हीही प्रवासादरम्यान ट्रेनच्या खिडकी किंवा दरवाजाजवळ मोबाईल वापरत असाल तर सावधान!

आजच्या काळात मोबाईल फोन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. सगळेच मोबाईलमध्ये व्यस्थ असतात, मोबाईल फोन हा टाईमपासचे चांगले साधन बनले आहे.विशेषत: ट्रेन किंवा बसने प्रवास करताना मोबाईलमुळे वेळ कसा निघुन जातो कळत नाही. मात्र मोबाईलमध्ये इतकंही गुंतून राहणं महागात पडू शकत. कारण याचाच फायदा घेत चोर तुमचा मोबाईल लंपास करू शकतात. ट्रेनमधून मोबाईल चोरीच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. चोर चालत्या ट्रेनमधून फोन किंवा पर्स चोरण्यासाठी खिडकी किंवा दारात उभ्या असलेल्या प्रवाशांनाच लक्ष्य करतात.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष

काही सेंकदात मोबाईल चोरी

या व्हिडिओमध्ये चोरानं व्यक्तीचं निरिक्षण करुन, त्याचा अंदाज घेत मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीच्या हातातून मोबाईल हिसकावला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रेनमध्ये खिडकीच्या बाजूला एक व्यक्ती निवांत मोबाईलमध्ये बघत बसला आहे. यावेळी ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबली असून एक व्यक्ती खिडकीच्या आजूबाजूला फिरताना दिसत आहे. हा चोर असून तो खिडकीजवळच्या व्यक्तीच्या हातातील मोबाईलचं निरिक्षण करुन योग्य वेळ साधण्याती वाट बघत आहे. हा व्हिडीओ बघताना तुम्हालाही कळणार नाही की हा चोर क्षणात कशाप्रकारे व्यक्तीच्या हातून मोबाईल लंपास करुन पसार होतो. मोबाईल चोरल्यानंतर त्या व्यक्तीलाही क्षणभर काही कळत नाही. त्यानंतर तो ट्रेनबाहेर जाऊन चोराचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” गरुडानं नजर टाकताच सापानं थेट डाव टाकला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

लोकांनी त्यांचे अनुभव सांगितले

हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. यासोबतच अनेकांनी त्यावर कमेंटही केल्या. एका व्यक्तीने लिहिले की अशा प्रकारे त्याचे दोन फोन चोरीला गेले आहेत. तर एकाने व्हिडिओच्या आधारे तक्रार करावी, अशी सूचना केली. व्हिडिओमध्ये चोरट्याचा चेहरा दिसत आहे. अशा स्थितीत तो पकडला जाणे अपेक्षित आहे. त्यांच्यासोबतही अशीच घटना घडल्याची तक्रार अनेकांनी केली.

Story img Loader