Viral video: रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढल्या आहेत. चोर रेल्वे स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत चोऱ्या करतात. लोकल ट्रेनमध्ये मोठी गर्दी असते. त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये अनेकदा चोरीच्या घटना घडतात. लोकलमधील गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांच्या वस्तूंवर डल्ला मारतात. म्हणूनच लोकलमधून प्रवास करताना अनेकजण मोबाईल चोरी जाणार नाही, याची काळजी घेत असतो. मात्र चोर आता नवनवीन आयडीया शोधून काढतात, खिडकीजवळ दरवाजाजवळ बसलेल्या प्रवाशांचे मोबाईल हे चोर सराईतपणे हिसकावून चोरी करतात. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे. तुम्हीही प्रवासादरम्यान ट्रेनच्या खिडकी किंवा दरवाजाजवळ मोबाईल चार्जिंगला लावत असाल तर सावधान! कारण चोर आता चार्जिगला लावलेले मोबाईलही ट्रेनच्या बाहेरुन लंपास करतात. हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

तुम्हीही ट्रेनमध्ये मोबाईल चार्जींगला लावता?

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Metro fight between two women abuses each other in delhi metro viral video on social media
आधी मेट्रोतून बाहेर ढकललं मग केली शिवीगाळ, महिलांमधलं भांडण इतकं टोकाला गेलं की…, VIDEO पाहून माराल कपाळावर हात
digital arrest video real cop catches scammer cop video viral
स्कॅमरचा झाला गेम! नकली पोलीस बनून खऱ्या पोलीस अधिकाऱ्याला केला व्हिडीओ कॉल अन्… VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
train accident mock drill video fact check
दोन ट्रेन समोरासमोर धडकल्या! रेल्वेचा एक डबा थेट दुसऱ्या डब्यावर चढला, अनेक प्रवासी गंभीर जखमी? अपघाताच्या घटनेचा थरारक Video? वाचा, सत्य घटना
article about journey of author subodh kulkarni as a content writer
चौकट मोडताना : ‘कंटेन्ट रायटर’पर्यंतचा मुलाचा प्रवास

आजच्या काळात मोबाईल फोन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. सगळेच मोबाईलमध्ये व्यस्थ असतात, मोबाईल फोन हा टाईमपासचे चांगले साधन बनले आहे.विशेषत: ट्रेन किंवा बसने प्रवास करताना मोबाईलमुळे वेळ कसा निघुन जातो कळत नाही. मोबाईलची चार्जींग संपली तरी हल्ली प्रत्येक ट्रेनमध्ये चार्जींगसाठी सुविधा असते. मात्र चोर आता इतके पटाईत झाले आहेत की, याचाच फायदा घेत चोर तुमचा मोबाईल लंपास करू शकतात. ट्रेनमधून मोबाईल चोरीच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. चोर चालत्या ट्रेनमधून फोन किंवा पर्स चोरण्यासाठी खिडकी किंवा दारात उभ्या असलेल्या प्रवाशांनाच लक्ष्य करतात. मात्र आता आणखी एक नवी युक्ती त्यांनी आणली आहे. ते आता थेट खिडकीच्या बाजूला चार्जींगला लावलेले मोबाईल आपल्याच डोळ्यादेखत चोरी करतात.

प्लॅटफॉर्मवर गाडी थांबताच ३ सेकंदात मोबाईल लंपास

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मोबाईल चार्जींगला लावला आहे आणि ट्रेनच्या आतमध्ये बऱ्यापैकी गर्दीही दिसत आहे. यावेळी प्रवाशांनी आपले मोबाईल चार्जींगला लावले आहेत. दरम्यान ही ट्रेन एका प्लॅटफॉर्मवर थांबते आणि तिथे एक तरुण बराच वेळ फेऱ्या मारताना दिसत आहे. तो फक्त फेऱ्या मारत नाही तर मोबाईल नक्की कुठे आहे कसा आहे याचा अंदाज घेतोय. यावेळी जशी ट्रेन सुरु होते तसा तो खिडकीजवळ जातो आणि खिडकीच्या आत हात घालून मोबाईल बाहेर खेचून पसार होतो. ट्रेन सुरु झाल्यामुळे चोराला पकडायलाही संधी मिळत नाही. चोर कसा पळून जातो हे तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “लेक बापाचा भार नाहीतर आधार” श्रमलेल्या बापासाठी लेक बनली आई; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

लोकांनी त्यांचे अनुभव सांगितले

हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. यासोबतच अनेकांनी त्यावर कमेंटही केल्या. एका व्यक्तीने लिहिले की अशा प्रकारे त्याचे दोन फोन चोरीला गेले आहेत. तर एकाने व्हिडिओच्या आधारे तक्रार करावी, अशी सूचना केली. व्हिडिओमध्ये चोरट्याचा चेहरा दिसत आहे. अशा स्थितीत तो पकडला जाणे अपेक्षित आहे. त्यांच्यासोबतही अशीच घटना घडल्याची तक्रार अनेकांनी केली.