Shocking video: मोबाईल कोण वापरत नाही? सगळेच वापरतात. मोबाईल वापरण्याचं प्रमाण जसं वाढलं, तसंच मोबाईलरांचंही प्रमाण वाढलं. कुणाच्या मोबाईलवर चोरटे कुठे, कधी हात टाकतील याचा काही नेम नाही. अशातच एक चोरीचा व्हिडीओ समोर आलाय. पण, व्हिडीओ पाहताना नेमकी चोरी झाली कुठे हे पहिल्यांदा पाहिल्यानंतर कळणारच नाही. त्यासाठी व्हिडीओ पुन्हा स्लो-मोशनमध्ये पाहावा लागतो. तेव्हा जाऊन कळतं, की नेमकी चोरी कशी, कोणत्या मिनिटाला केली गेली. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही इथून पुढे सतर्क राहाल.
कुठलीही चोरी करण्यापूर्वी चोर प्रचंड अभ्यास करतात असं म्हटलं जातं. सर्वात आधी ते वस्तूचं बारीक निरिक्षण करतात. ती वस्तू कशी चोरता येईल या बद्दत नियोजन आखतात. अन् चोरी फसलीच तर काय करायचं याबाबतही प्लान बी रेडी असतो. चोरांना इतकी तयारी ही करावीच लागते. कारण चोरी करणं हा गुन्हा आहे. अन् जर तुम्ही पकडला गेलात तर तुमची काही खैर नाही. पोलीस नंतर मारतात आधी पब्लिकच चांगली धुलाई करते. अन् शेवटी तुरुंगाची हवा खावी लागते हे तर वेगळंच. मात्र सध्या समोर आलेला चोरीचा व्हिडीओ पाहून म्हणाल या चोरानं अभ्यास नाही तर चोरी कशी करायची यावर पीएचडीच केली असावी.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका बाजारातील हा व्हिडीओ आहे. बाजारात मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळत आहे. अशातच एक तरुण अचानक एका काकांच्या समोर येतो आणि त्यांना मुद्दाम धक्का देतो. यावेळी ते स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करताना हा चोर गपचूप चोरी करण्याचा प्रयत्न करतो. तो काकांच्या खिशातून सहज मोबाईल काढून पळ काढण्याचा प्रयत्न करतो मात्र ही गोष्ट सुदैवानं काकांच्या लक्षात येते आणि ते चोराला पकडतात. यावेळी ते त्यांचा मोबाईल चोराच्या हातातून खेचून घेतात आणि पुढच्याच क्षणी तो चोर तिथून पळत सुटतो.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DHVm0sKPfuZ/?utm_source=ig_web_copy_link

हा व्हिडीओ lazy_looser_l नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एकाने म्हंटलं आहे की, “बापरे काय चोर आहे” दुसरा म्हणतो “चोरांना वाटले असावे की सीसीटीव्ही नसतील.” तर आणखी एकानं धरुन चोपला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया दिलीय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thief steals mobile phone from uncle in market rush get caught in video accidentally shocking video viral on social media srk