Viral video: चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून दररोज चोरीच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. सोन्याचे दागिने, रोख रक्कम, वाहने इत्यादी चोरी होणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र सध्या चोरट्यांची नजर एटीएम मशीनकडेही लागली आहे. एटीएम मशिन चोरीशी संबंधित अनेक प्रकरणे आतापर्यंत समोर आली आहेत. असंच एक प्रकरण पुन्हा एकदा समोर आलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका चोराने एटीएम मशीन चोरण्यासाठी अशी शक्कल लढवली आहे की पाहून तुम्हीही चकीत व्हाल.

चक्क जेसीबीने केली चोरी

77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
in pune mobile thief dragged youth and bite his hand for mobile at hadapsar area
मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यांनी पादचारी तरुणाला फरफटत नेले, विरोध करणाऱ्या तरुणाचा हाताचा चावा
Mumbai railway platform Thief got caught stealing wallet inside shocking video goes viral
मुंबईकरांनो चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या मागे उभे राहतात अन्…VIDEO एकादा पाहाच
Shocking video in mumbai Waseem Amrohis Car Was Broken Into By Thieves Who Were Trying To Steal His Phone And Laptop Video Viral
तुम्हीही कार पार्क करुन बिनधास्त निघून जाता? अवघ्या सेंकदात बंद कारमध्ये कशी करतात चोरी पाहा; मुंबईतला VIDEO पाहून धक्का बसेल
pune burglaries marathi news
पुणे : तीन घरफोड्यांत साडेसहा लाखाचा ऐवज चोरीला
Absconding young woman arrested , woman arrested fraud case, woman fraud with builder,
पुणे : बांधकाम व्यावसायिकाची चार कोटींची फसवणूक प्रकरणात फरार झालेली तरुणी गजाआड

एटीएम मशीन लुटण्यासाठी चोरांनी चक्क जेसीबी आणला. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सीसीटीव्हीपासून लपण्यासाठी चोरट्यांनी जेसीबीने संपूर्ण एटीएम मशीनच उखडून पळ काढलाय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एटीएम मशीनजवळ खुर्चीवर बसल्याचे दिसत आहे. याचवेळी अचानक भींत तोडून जेसीबी आतमध्ये प्रवेश करतो. यावेळी जेसीबी येत असल्याचे पाहून ती व्यक्ती घाबरली आणि तेथून पळून गेली. चोर पूर्ण प्लॅनिंग करून आला होता, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही चोरी करण्यासाठी त्यांनी जेसीबीची मदत घेतली. या व्यक्तीने जेसीबीचा वापर करून खोलीची तोडफोड करण्यास सुरुवात केली. एटीएम मशीनचेही तुकडे केले.

लाखो रुपयांनी भरलेले एटीएम रातोरात उखडले

एटीएम मशीन फोडल्यानंतर त्या व्यक्तीने खोलीत प्रवेश केला आणि एटीएम मशीनला दोरीने बांधण्यास सुरुवात केली, जेणेकरून ते तेथून सहज बाहेर काढता येईल. चोराने आपल्यासोबत एक कार आणि जेसीबी आणला होता. पकडले गेल्यास त्याचे काय परिणाम होतील याचा त्याने एकदाही विचार केला नाही. खूप प्रयत् केल्यानंतर तो एटीएम मशिन सोबत घेऊन जातो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: ट्रेनमध्ये अश्लिल इशारे करणाऱ्यास चपलेचा प्रसाद; महिलेनं १५ सेकंदात घडवली आयुष्यभराची अद्दल

ही घटना अमेरिकेतील ओकलँडमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. एटीएम मशीन चोरीची ही पहिली घटना नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सोशल मीडियावर दररोज चोरीचे धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे पाहिल्यानंतर लोकांची चांगलीच तारांबळ उडते.

Story img Loader