‘अतिघाई संकटात नेई’ असं नेहमी सांगितलं जातं, पण हे ऐकतंय कोण? जोपर्यंत संकट येत नाही तोपर्यंत आपल्याला काही याची प्रचिती येत नाही. अमेरिकेतल्या चोरांबाबतही असंच झालं. यांना चोरी करण्याची एवढी घाई झाली की या नादात चोरांनी चक्क पैशांनाच आग लावून टाकली. आता चोरांनी केलेला हा मुर्खपणा ऐकून तुम्हालाही हसू आलं असेल ना? पण काय करणार जगात एवढे मुर्ख लोक भरले आहेत की असे प्रकार घडतातच. अमेरिकेतल्या वॉश्गिंटनमध्ये दोन चोरांनी एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. आता एटीएमधून पटापटा पैसे काढून तिथून पोबारा करण्याचा त्यांचा बेत होता खरा. तेव्हा या चोरांनी यंत्र उघडण्यासाठी ब्लो टॉर्च आणला. त्याच्या मदतीने फायबरचा भाग वितळवता येईल आणि कामही पटकन होईल असं त्यांना वाटलं. तेव्हा कोणताही विचार न करता या महामुर्ख चोरांनी ब्लो टॉर्च पेटवला.

यामुळे काम सोप्प झालं खरं पण नंतर मात्र दुर्दैवी प्रकार घडला. बघता बघता आगीमुळे एटीएमने पेट घेतला आणि काही मिनिटांत एटीएम जळून खाक झाले. तेव्हा तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती धुपाटणं आलं अशी अवस्था या दोघांची झाली. या दोघांच्या मुर्खपणामुळे लखो रुपयांचं मशीन तर जळालंच पण त्याचबरोबर लाखो रुपये जळूनही खाक झाले.

वाचा : केरळमधील मंदिरात मुस्लिम बांधवांसाठी ‘इफ्तार पार्टी’

वाचा : ‘आयएएस’ अधिकारी होण्यासाठी त्याने नाकारली २२ लाखांची नोकरी

Story img Loader