चोरी करणे हा कायेदशीर गुन्हा आहे पण हे अत्यंत जोखमीचे काम आहे. चोरी करण्यासाठी चोरटे काय काय कल्पना शोधून काढतील हे काही सांगता येणार नाही. चोरी करण्यासाठी चोरटे कोणत्याही थराला जाऊ शकतात. चोरी करण्यासाठी ते एकापेक्षा एक वरचढ जुगाड शोधून काढतात. अनेकदा सोशल मिडियावर चोरीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये चोरट्यांनी चोरीसाठी केलेला जुगाड पाहून नेटकरी चक्रावले आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, रस्त्यावर जोरदार वेगाने एक ट्रक धावत आहे. त्यामागे असलेल्या बाइकवर दोन व्यक्ती आहेत. एक व्यक्ती गाडी चालवत आहे तर दुसरा ट्रकमधून चोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. चक्क बाइकव उभे राहून हा व्यक्ती चालत्या टॅकला लावलेल्या कापडाच्या मोठ्या छिद्रातून आत शिरताना दिसत आहे. टॅकमधून काही वस्तू तो काढतो आणि पुन्हा बाइकवर बसतो. हे सर्व प्रकार धावत्या ट्रकमध्ये करण्यात आला. चोरटेही ट्रकबरोबर बाइक चालवताना दिसत आहे. जराही अंदाज चुकला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. पण कशाचीही पर्वा न करता हे चोरटे दिवसा ढवळ्या चोरी करत आहे. हा सर्व प्रकार मागून येणाऱ्या गाडीमध्ये असणाऱ्या व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केला आहे. चोरट्यांचा चोरीसाठी केलेला जुगाड पाहून लोक थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी आवाक् झाले आहेत.

bike thief shocking video viral
तुम्ही बाईक बिनधास्त कुठेही पार्क करताय? चोर अवघ्या सेकंदात अशी करतायत बाईकची चोरी; धक्कादायक VIDEO पाहाच
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Man climbed on truck to catch the kite during makar Sankranti pune video viral
हे फक्त पुण्यातच घडू शकतं! एका पतंगासाठी पठ्ठ्यानं केलं ट्रॅफिक जाम, भररस्त्यात ट्रकवर चढला अन्…, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Shocking video MP: Fraudsters Replace QR Codes Of Several Shopkeepers To Redirect Payment In Their Bank Accounts In Khajuraho
तुम्हीही सगळीकडे QR कोडने पेमेंट करता का? वेळीच सावध व्हा; फसवणुकीचा हा Video पाहून दुकानदारांच्या पायाखालची जमीन सरकेल
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो

हेही वाचा – मरता मरता वाचला तरुण; जीममध्ये डोक्यात पडणार होता रॉड अन् तेवढ्यात…घटनेचा व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा – परीक्षेत ‘कॉपी’ करण्यासाठी विद्यार्थ्याने वापरल्या चक्क १०-२० रुपयांच्या नोटा, ‘कॉपी’ची नवी पद्धत पाहून शिक्षकही चक्रावले

इंस्टाग्रामवर ankitt_.c नावाच्या अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ नक्की कुठला आहे याबाबत खात्रीशीर माहिती उपबलब्ध नाही. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एकाने व्हिडीओ काढणाऱ्याना उद्देशून म्हटले की, रेकॉर्ड करण्यापेक्षा त्यांना धडक द्यायला पाहिजे होती तर दुसऱ्याने लिहिले की, “जर आम्ही त्याला मागून येऊन धडक दिली तर आम्हाला अटक होईल का?’ तिसऱ्याने विचारले की,”त्यांनी नक्की काय चोरले?”

Story img Loader