सध्या एका नवरदेवासोबत अशी घटना घडली आहे, ती पाहून इथून पुढे कोणीही लग्नात नवरदेवाच्या गळ्यात पैशांच्या माळ घालताना घाबरतील यात शंका नाही. हो कारण एका नवरदेवाने लग्न समारंभादरम्यान गळ्यात ४००, ५०० रुपयांच्या नोटांचा हार घातला होते. तो हार चोरट्यांनी सर्वांसमोर पळवल्याची घटना उघडकीस आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे जवळपास या नवरदेवाच्या गळ्यातील हार तब्बल २ लाख रुपयांचा होता. त्यामुळे या नवरदेवाला ऐन लग्नात दोन लाखांचा बुर्दुंड लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गळ्यातील पैशांचा हार पळवलेल्या नवरदेवाचे नाव रिझवान खान असून ही घटना गुरुवारी रात्री पश्चिम दिल्लीतील मायापुरी येथील एका बँक्वेट हॉलच्या बाहेर घडली आहे.
हेही वाचा- “प्यार किया तो डरना क्या” भरवर्गात शिक्षकांसमोर गर्लफ्रेंडशी बोलणाऱ्या विद्यार्थ्याचा Video व्हायरल
पोलिसांनी सांगितले की, नवऱ्याची घोड्यावरुन मिरवणूक सुरु असतानाच दोन चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील पैशांचा हार पळवला. दोन चोरट्यांनी ४००, ५०० रुपयांच्या जवळपास ३२९ नोटा पळवल्या आङेत. शिवाय त्यातील काही नोटा रस्त्यावरही पडल्या होत्या. नवरदेवाच्या गळ्यातील पैशांचा हार त्याचा मेहुणा, सरफराज खानने भेट दिली होती. संशयित चोरट्यांचा काही लोकांनी पाठलाग केला परंतू ते सापडले नाहीत.
हेही वाचा- जास्तीच्या पैशांचा मोह नडला! IT कर्मचाऱ्याने एका क्लिकमध्ये गमावले ८४ लाख रुपये
पोलिसांच्या माहितीनुसार, लग्नाची मिरवणूक सुरु असतानाच स्कूटीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी नवरदेवाच्या गळ्यातील पैशांच्या नोटा पळवल्या. त्यानंतर दिल्लीतील जगतपुरी पोलिस ठाण्यात हा या चोरीप्रकरेणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करताना अनेक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता संशयिताची ओळख पटली. ज्या बँक्वेट हॉलमध्ये ही चोरी झाली होती त्यापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या हरी नगर परिसरातून चोरट्यांना पकडण्यात आले असून त्याच्या घरातून सुमारे ७९ नोटा जप्त करण्यात आल्या आहेत,” असेही पोलिसांनी सांगितले.