Thieves Tried To Rob ATM Machin Through Forklift Machin : चोरीच्या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. काही चोर ट्रेनमध्ये मोबाईल, सोनसाखळी खेचण्याच्या छोट्या-मोठ्या चोऱ्या करतात. पण नुकताच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण या चोरट्यांनी चक्क एटीएम मशिनच चोरण्याचा प्रयत्न केला. फोर्कलिफ्टची मोठ्या क्रेनसारखी मशिन घेऊन चोर एटीएम फोडण्यासाठी आले, परंतु काही सेकंदातच जे घडलं ते पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. ही चोरीची धक्कादायक घटना संयुक्त राज्य अमेरिकेच्या उत्तर भागातील सेक्रामेंटो (कॅलिफोर्निया) येथे घडली. या चोरीच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं काय घडलं?

रस्त्यावर असलेली एटीएम मशिन चोरण्यासाठी चोरांनी फोर्कलिफ्ट मशिनचा वापर केला. पण चोरांना एटीएम मशिन फोडण्यात अपयश आलं आणि एटीएमला रस्त्याच्या मधोमध सोडून पळून गेले. सेक्रामेंटो काउंटी शेरिफ ऑफिसच्या सोशल मीडियावर पेजवर या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, चोर सेफ क्रेडिट यूनियनच्या एटीएमला चोरण्याच्या प्रयत्न करत आहेत.

नक्की वाचा – Optical Illusion: फोटोत जत्रा दिसतेय ना? पण या गर्दीत एक कार सुद्धा लपलीय, दिसली नसेल तर क्लिल करून पाहा

इथे पाहा ATM चोरीचा धक्कादायक व्हिडीओ

व्हिडीओत पाहू शकता, ऑरेंज रंगाची सुरक्षा जॅकेट घालून एक चोरटा फोर्कलिफ्ट ट्रकचा वापर करून एटीएम फोडण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर एटीएम मशिन जमिनीवर पडते. तर दुसरा चोरटा मशिनजवळ ट्रकच्या बाजूला प्रतीक्षा करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. शेरिफ कार्यालयाकडून सांगण्यात आलं की, दरोडा टाकण्याचा प्रयत्न २ ऑगस्टला सकाळी ६ वाजताच्या दरम्यान करण्यात आला. दुसरा संशयास्पद चोरटा मशिन घेऊन गेला. परंतु, ते पळण्याचा प्रयत्न करत असताना एटीएम मशिन वॉट एवेन्यू दरम्यान ट्रकमधून खाली पडली. दोन्ही संशयास्पद आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. अधिकारी या फूटेजचा तपास करीत आहेत. त्यानंतर चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल.