Viral Video : स्वप्ननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत हजारो लोकं आपली स्वप्ने घेऊन येतात. एकदा कोणी या शहरात आले की त्याला या शहराचे वेड लागते. मुंबईचा समुद्र असो की येथील वडापाव, येथील प्रत्येक गोष्ट लोकप्रिय आहे. लोकल ट्रेन तर मुंबईच्या काळजाचा विषय आहे. दरदिवशी हजारो लोकं लोकलनी प्रवास करतात. मुंबई रेल्वेस्टेशनवर तर दररोज भयंकर गर्दी पाहायला मिळते. अनेक लोक लोकल आणि रेल्वेने प्रवास करतात. मुंबई रेल्वे स्टेशनवरील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ काही सफाई कामगार रेल्वे स्टेशनवरील घाण स्वच्छ करताना दिसत आहे.

अनेक लोकांना गुटखा, पान, तंबाखू खायची सवय असते. असे लोक सार्वजानिक ठिकाणी कोणताही विचार न करता कुठेही थुंकतात पण हा व्हिडीओ पाहल्यानंतर पुढच्या वेळी स्टेशनवर थुंकण्यापूर्वी त्यांना नक्कीच विचार करायला भाग पाडेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये काही सफाई कामगार महिला स्टेशनवर लोकांनी थुकलेला गुटखा, पान, तंबाखू स्वच्छ करताना दिसत आहे. त्यांना ही घाण स्वच्छ करताना किती मेहनत घ्यावी लागतेय, हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून समजेल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Nagpur Police starts vasuli from sellers
नागपूर पोलिसांकडून वसुलीचा ‘नाईट पॅटर्न’…. रस्त्यावरचे दिवे मालवून…
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
implementation of hawkers policy stalled for ten years
विश्लेषण : मुंबईत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी दहा वर्षे का रखडली? मुजोर फेरीवाल्यांना ‘राजकीय आशिर्वाद’?
Father and son imprisonment, imprisonment beat police,
मुंबई : कर्तव्या बजावणाऱ्या पोलिसांना मारहाण करणे महागात, पिता-पुत्राला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा
Baba Siddiqui murder case, Baba Siddiqui,
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणः …या कारणामुळे हल्लेखोरांनी दुचाकी वापरली नाही
FASTAG, road tax Mumbai, traffic jam Mumbai,
दुसऱ्या दिवशीही पथकराचा गोंधळ कायम, फास्टॅगमधून पैसे कापल्याचे संदेश, मार्गिकांच्या गोंधळामुळे वाहतूक कोंडी
Loksatta explained Why are political leaders killed Apart from politics there are other reasons behind the murder
राजकीय नेत्यांच्या हत्या का होतात? हत्येमागे अनेकदा राजकारण वगळता ‘अन्य’ कारणेच?
devendra fadnavis on women complaints
महानगरातील आव्हाने पेलण्यासाठी पोलीस दलात अत्याधुनिक सुविधा- महिलांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे गृहमंत्री फडणवीस यांचे आदेश

हेही वाचा : ” भूत.. भूत..” पीपीई किट घातलेल्या डॉक्टरांना पाहून घाबरली महिला रुग्ण, पाहा मजेशीर व्हिडीओ

aamchi_mumbai या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुढच्या वेळी स्टेशनवर थुंकण्यापूर्वी विचार करा, कोणाची तरी आई- बाप हे सर्व साफ करत असेल”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय,”पहिल्यांदा गाडीत आणि स्टेशनवर गुटखा आणि पान विक्री बंद करुन टाका” तर एका युजरने लिहिलेय, “हे व्हिडीओ रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमध्ये दाखवले पाहिजे.. तेव्हा त्यांना लाज वाटेल” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरंच काही लोकं मुर्ख असतात. जे हे दृष्य बघत असतील तरीही थुंकून जातील.त्यांना असे करू नका हे सांगणे आपले एक भारतीय नागरीक म्हणून कर्तव्य आहे.”