काही लोकांच्या खाण्याचा सवयी इतरांपेक्षा फार वेगळ्या असतात. अशी लोक त्यांना जे आवडते तेच खातात त्यापेक्षा वेगळे काही खाण्याचा प्रयत्न ते करतच नाही. जगभरात खाण्याच्या अशा विचित्र सवयी असणारे अनेक आहेत. कर्नाटकमध्ये एक मुलगी अशी आहे जिची खाण्याची सवय ही अशीच सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. ही मुलगी जन्मल्यापासून फक्त आणि फक्त पार्ले-जी बिस्किट खाते. तुमचा यावर कदाचित विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी आहे.
कर्नाटकातील रमाव्वा ही मुलगी पार्ले-जी बिस्किटवरच जगते. अन्नाऐवजी ही मुलगी दिवसातून सहा ते सात पार्ले-जीचे पुडे खाते. ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने ही माहिती दिली आहे. या मुलीला जुळा भाऊ आहे. या दोन्ही अपत्यांना जन्मल्यावर आईने दुधातून बिस्किट भरवायला सुरुवात केली. फारसे पैसे नसल्याने मुलांना स्वस्तात मिळणारे पार्ले-जी बिस्किट आणि घराच्या गायीचे दूध एवढाच आहार मिळायचा म्हणून या मुलीला पार्ले-जी बिस्किट खाण्याची सवय लागली. तिच्या भावाला देखील अशीच सवय होती पण तो जसजसा मोठा होत गेला त्याची ही सवय सुटली. पण गेल्या अठरा वर्षांपासून रमाव्वाची ही सवय सुटली नाही.
तिची ही सवय सोडवताना घरच्यांच्या नाकी नऊ आले. पण सवय काही केल्या सुटली नाही. आता या विचित्र खाण्याच्या विचित्र सवयीमुळे तिचे कोणाशीच लग्न होणार नाही अशी भिती या मुलीच्या पालकांनी बोलून दाखवली. तर आपल्याला या बिस्किटांशिवाय दुसरे काही खावेसेच वाटत नाही असे रमाव्वाने सांगितले. जर पार्ले-जी कंपनी बंद पडली तर माझे काय होईल ? मी कशी जगेन अशी भिती रमाव्वाला वाटते. तिच्या या खाण्याच्या सवयीवर याच राज्याच्या लेक व्ह्यु रुग्णालयात अधिक संशोधक करण्यात आले. डॉक्टरांनी तिला इतर अन्नपदार्थ देऊन पाहिले पण त्यांचेही प्रयत्न व्यर्थ ठरले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा