Viral video: सोशल मीडिया हे आता लोकांना कला दाखवण्यासाठी प्लॅटफॉर्म बनलं आहे. अनेकदा लोकांमध्ये टॅलेंट असतं पण ते दाखवण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत नाही. पण जेव्हापासून सोशल मीडियाने आपले पंख पसरले आहेत. तेव्हापासून कोणीही सोशल मीडियावर लाखो लोकांपर्यंत पोहचू शकतेय. भारतातही असे अनेक लोक आहेत ज्यांनी सोशल मीडियाच्या मदतीने मोठे यश मिळवले आहे. सध्या एक मुलगा सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा २१ वर्षांचा मुलगा लोकांना इंग्रजी शिकवतो. परंतु त्याची इंग्रजी शिकवण्याची पद्धत इतर सर्वांपेक्षा वेगळी आहे.त्याचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही त्याचे फॅन व्हाल.

२१ वर्षाचा इन्फ्लुएंसर

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Boys dance on nach re mora ambyahya vanat song at school get together function funny video goes viral
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” गेट दुगेदरला शाळेतल्या जुन्या मित्रांनी केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
anoushka kale cambridge
ऐतिहासिक केंब्रिज युनियनच्या अध्यक्षपदी भारतीय विद्यार्थिनीची निवड; कोण आहेत अनुष्का काळे?
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
autoriksha
‘२०० रुपये जास्त मागितले, माराहाण करण्याची दिली धमकी’, रिक्षावाल्याने २० वर्षीय तरुणाला छळले, धक्कादायक घटनेचा Video Viral
viral video
VIDEO : असे विद्यार्थी मराठी शाळेतच घडू शकतात! संगणकालाही टक्कर देतात हे विद्यार्थी, अनोखी कला एकदा पाहाच

ओरिसाचा राहणारा २१ वर्षीय धीरज टाकरी सध्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. याचे कारण म्हणजे धीरज टाकरी यांची इंग्रजी शिकवण्याची शैली. वास्तविक, धीरज भारतात राहून लोकांना परदेशी लोकांसारखे इंग्रजी बोलायला शिकवतो. त्याची शिकवण्याची पद्धत लोकांना खूप आवडत आहे. इन्स्टाग्रामवर धीरजचे दहा लाख फॉलोअर्स आहेत.धीरजने त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये लिहिले आहे की, परदेशात न जाता परदेशातलं इंग्रजी बोला. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अमेरिकन अ‍ॅक्सेंटमध्ये इंग्रजी शिकवतो

धीरज टाकरी यांची इंग्रजी शिकण्याची शैली इतर शिक्षकांपेक्षा खूपच वेगळी आहे. धीरज केवळ इंग्रजी कसे बोलावे हे शिकवत नाही तर अमेरिकन उच्चारणात इंग्रजी कसे बोलावे हे देखील शिकवतो. धीरजचा शेवटचा व्हिडिओ ७ जानेवारीला त्याच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये धीरज अमेरिकन उच्चारणात गुड मॉर्निंग कसे म्हणायचे ते सांगत आहे. धीरजने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, जेव्हा तुम्ही एखाद्याला गुड मॉर्निंग म्हणाल तेव्हा गुडमधून ड काढून ‘गु मॉर्निंग’ म्हणा. अशा प्रकारे एक, दोन शब्द बोलयाला त्यानं शिकवले आहे. त्याचा हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: ‘काका तुमचं कुटुंब घरी वाट पाहतंय’ पाच मिनिट उशीर होईल पण असा प्रवास करू नका

सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून तर वृद्ध लोकांपर्यंत हे व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही रातोरात स्टार झालेलेही उदाहरण आहेत. कुठेही काहीही घडलं की क्षणात त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहचते. माध्यमांमध्ये सध्या सोशल मीडिया हे माध्यम ट्रेडींगवर आहे.

Story img Loader