अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात. त्यांना सतत दुसऱ्यांच्या राहणीमानाचं आणि त्यांच्या आरामदायी जीवनाचं कौतुक वाटतं. शिवाय श्रीमंत मित्रांच्या तुलनेत आपण खूपच कमी असल्याची तक्रार ते खासगीत करत असतात. मात्र, आपल्या आजुबाजूला काही लोक असेही असतात ज्यांना दोन वेळेचं जेवणही मिळत नाही. अशा लोकांना पाहिल्यावर अनेकांना आपण खूप सुखी असल्याचं जाणवतं. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना जगण्यासाठी दररोज नवा संघर्ष करावा लागतो. उतार वयातही हे लोक संघर्ष करतात, विशेष म्हणजे हे मेहनत करु खातात. अशाच एका आजोबांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

समाजात प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. नोकरी, लग्न, मुलं, कामाचं वय आणि ही सगळी कामं पूर्ण करून थकल्यावर निवृती. मात्र समाजात काही असेही लोक आहेत ज्यांना आराम हा माहितच नसतो. ते आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत अगदी मेहनत करायला तयार असतात. ज्यांच्यासाठी वय हा फक्त एक आकडा आहे. अशाच एका आजोबांची गोष्ट आज आम्ही तु्म्हाला सांगणार आहोत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती हातात रुमाल धरून विकत आहे. ते म्हणतात, “मी 17 वर्षांपासून येथे रुमाल विकतो. माझे नाव हसन अली आहे पण लोक मला काका म्हणतात. माझा मुलगा म्हणतो, ‘कितना काम’ करोगे, अब्बा?’ पण मी त्याला नेहमी सांगतो की मला सक्रिय राहायचे आहे, अंथरुणावर झोपायचे नाही.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Viral video: तरुणी आगीत होरपळली; फायर शॉटचा नाद जिवावर बेतला…

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या व्हिडिओला १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.