सोशल मीडियावर अनेक मजेशीर आणि गंमतीदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ नेटकऱ्यांचे मनोरंजन करत असतात तर काही व्हिडिओ आपल्याला प्रेरणा देत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. अनेक वेळा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचं चांगलं मनोरंजन होतं. कधी प्राण्याचे, तर कधी काही विचित्र व्हिडीओ व्हायरल होतात आणि चर्चेत विषय ठरतात. सध्या अशाच एक आजीबाई चर्चेचा विषय बनल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या आजीबाईंच्या व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्की थक्क व्हाल, एवढं मात्र नक्की.
एक प्रेरणादायी आणि कौतुकास्पद व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक ८० वर्षांच्या आजी बिनधास्तपणे सायकल चालवताना दिसत आहेत. एका दुचाकीवरील प्रवाशाने या आजींचा व्हिडिओ शूट केला आहे. तसेच त्यांना वय विचारले असता आजींनी आपण ८० वर्षांच्या असल्याचं सांगितलं आहे. @s_borawake या ट्विटर यूजर्सने या आजीचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटलं आहे की, ‘आयुष्यात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते पण चेहऱ्यावर मात्र कायमस्वरूपी स्मितहास्य असले पाहिजे. या वाक्यांना साजेस् असं उदाहरण पुण्यातल्या वारजेतील या आजी!’
पाहा व्हिडीओ
हा प्रेरणादायी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.