अगदी जसेच्या तसे कपडे दोघांनी घातले तर आपल्याकडे बँडवाले म्हणून सगळेच टेर खेचतात. एकसारखेच कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी वावरताना अनेक जण विनोद करतात. त्यामुळे कॉलेजमध्ये किंवा तसाच काहीचा प्रसंग असल्याशिवाय मँचिंग कपडे घालण्याचा योग येणे दुर्मिळच. पण सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याचा फोटो व्हायर झाला आहे. हे जोडपे रोजच मँचिंग कपडे घालून वावरतात. गेल्या ५२ वर्षांपासून हे जोडपे एकत्र आहे. आठवड्यातून एकदा डान्स क्लासेसना जाताना हे जोडपे मँचिंग कपडे घालून जायचे, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना यांच्या मँचिंग कपड्यांचे कुतूहल असायचे पण एके दिवशी मात्र या जोडप्याने मँचिंग कपडे घातले नाही, त्यामुळे आज काय झाले मँचिंग कपडे न घालण्यास? असे सवाल आजूबाजूचे विचारायला लागले तेव्हापासून आठवड्यातून एकदा नाही तर रोजच मँचिंग कपडे घालण्याचा संकल्प या जोडप्याने केला. गेल्या दीड वर्षांपासून हे जोडपे मँचिग कपडे घालत आहे. या जोडप्याच्या नातवाने त्यांच्या मँचिंग कपडे घातलेला फोटो ट्विटरवर टाकला आहे आणि दोन दिवसांत दररोज मँचिंग कपडे घालणा-या या वुद्ध जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. या फोटोला त्याच्या ट्विटर अकाउंटवर ८१ हजार लाईक्स आहेत तर ३८ हजारांहूनही अधिक लोकांनी ही पोस्ट ट्विटरवर रिट्विट केली आहे.
आजी आजोबांचे कपडे सेम टू सेम
रोज मँचिंग कपडे घालण्याचा जोडप्याचा संकल्प
Written by लोकसत्ता टीम
![आजी आजोबांचे कपडे सेम टू सेम](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2016/09/couple-main.jpg?w=1024)
First published on: 02-09-2016 at 15:55 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This adorable couple has been married for 52 years and match their clothes every day