प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं की, आपल्याला एखाद्या राजकुमारासारखा नवरा मिळावा. पण एका सामान्य मुलीनं राजकुमाराशी लग्न करण्याची कितीही स्वप्नं पाहिली तरी ती पूर्ण होतातच असं नाही. इथोपिआतील एक तरुणी मात्र याबाबत खरंच नशीबवान ठरली. कारण तिला स्वप्नात नाही तर प्रत्यक्षात राजकुमार भेटला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अरिना ऑस्टिन नावाची सामान्य घरात जन्मलेली तरूणी आता इथोपियाच्या राजघराण्याची सून झाली आहे. इथोपियाचे राजपुत्र जोल मॅकननसोबत ती नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. या दोघांनी प्रेमकथा अगदी परिकथेसारखीच आहे. अरिना काही वर्षांपूर्वी वॉशिंग्टनमधल्या नाईट क्लबमध्ये गेली होती. याठिकाणी आपल्याला खराखुरा राजकुमार भेटेल याची कल्पनाही तिने केली नव्हती. यावेळी जोलने अरिनाला पाहिलं आणि पाहताचक्षणी तो तिच्या प्रेमात पडला. पण अरिनापासून मात्र त्याने आपली खरी ओळख तेव्हा लपवून ठेवली. ‘तू एका जाहिरातीतल्या मॉडेलसारखी दिसते’ या वाक्यापासून सुरू झालेलं त्यांच्या संवादाचं रुपांतर नंतर प्रेमात झालं.

२१ वर्षांपूर्वी वडिलांची हत्या; पित्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘ती’ न्यायाधीश झाली

जोल नेमका कोण आहे हेच अरिनाला माहित नव्हतं. आपण वकिल असल्याचं जोलनं अरिनाला सांगितलं. गेल्या बारा वर्षांपासून अरिना आणि जोल एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहत होते. नंतर मात्र आपण इथोपियाचे राजपुत्र असल्याचे जोलने तिला सांगितलं. या दोघांचाही शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला. जरी परिकथेतल्या कहाण्या प्रत्यक्षात उतरत नसल्या तरी अरिनाची काहाणी मात्र परिकथेतल्या गोष्टीला अगदी साजेशी ठरली.

विकृतपणाचा कळस! ‘हे’ इन्स्टाग्राम अकाऊंट पाहून प्रत्येक महिलेला चीड येईल