सोशल मिडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही गंमतीशीर असतात तर काही आपल्याला चक्रावून सोडणारे असतात. काही दिवसांपूर्वी एका कोरिअन व्यक्तीचा बिहारी शैलीत हिंदी बोलतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. परदेशी लोकांना भारताच्या संस्कृतीचं, खाद्यपदार्थांचं असणारे आकर्षण पाहून भारतीयांना फार कौतूक वाटतं. सोशल मीडियावर अशाच एका अमेरिकन युट्युबरचा व्हिडिओ व्हायरल होत आहेत, जो हिंदीमध्ये बोलत आहे. या व्यक्तीला बिहारमध्ये राहायचे आहे आणि त्याचं कारण ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल! चला तर मग जाणून घेऊ या काय आहे हा व्हिडिओ.
आपल्यापैकी कित्येक लोकांना समोसा प्रचंड आवडतो. गरम गरम आणि कुरकरीत समोसा…त्यावर चिचेची चटणी आणि शेव…..आहा! तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल नाही. समोसा चवीला जितका चविष्ट तितकाच खिशाला परवडणारा पदार्थ आहे. समोसा भारतीयांचा आवडीचा पदार्थ आहेत पण आता अमेरिकन युट्युबरलादेखील त्याची भुरळ पडली आहे.
अमेरिकेत ५०० रुपयांना २ समोसा
व्हिडिओ युट्यूबर सांगत आहे की, अमेरिकेत दोन समोस्यांची किंमत ५०० रुपयांपेक्षा जास्त आहे हे जाणून त्याला आश्चर्य वाटले आणि फार दुःख झाले आणि “चल वापस बिहार चलते हैं भाई” असे म्हणत आहे. Drew ने रेस्टॉरंटचा मेनू देखील दाखवला जिथे २ समोसाच्या किंमत $ ७.४९ होती, जी अंदाजे ६१८ रुपये आहे. ड्रूने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी लहान होतो तेव्हा ते ५ रुपयांचे एक समोसा मिळायचा.”
अमेरिकन युट्युबर खायचायं बिहारमधील २० रुपयांचा समोसा
असे घडले की ड्रू हिक्स, जो त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये स्वतःला अमेरिकन हिंदी यूट्यूबर म्हणून वर्णन करतो, तो अमेरिकेतील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये गेला. त्याला समोसे मागवायचे होते पण दोन समोस्यांची किंमत पाहून त्याला धक्काच बसला आणि त्याला बिहारमधील दिवसांची आठवण झाली. तो आपल्या व्हिडिओमध्ये त्याने त्याबद्दलचे आपले विचार व्यक्त करत आणि बिहारला परत जाण्याची इच्छा व्यक्त केली, जिथे त्याने फक्त 20 रुपयांमध्ये समोसे खाल्ले होते. विशिष म्हणजे हे सर्व त्यांनी हिंदी भाषेमध्ये सांगितले आहे.
हेही वाचा – Viral Video: कोरिअन व्यक्तीची बिहारी ऐकून थक्क झाले नेटकरी; म्हणाले, ”हा तर…”
व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी भारतात परत बोलावले
या व्हिडिओला आतापर्यंत 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. क्लिप पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही लोकांनी त्याला भारतात परत बोलावले. एका युजरने ‘बिहार भाऊ परत या’ अशी कमेंट केली. दुसर्याने लिहिले – ”समोसे घेण्यासाठी बिहारला या भाऊ”.