Anti Procrastination Cafe : शाळा, कॉलेज असाइनमेंट असो किंवा ऑफिस प्रोजेक्ट प्रत्येकाला एका डेडलाइनवर काम करावे लागते. यात तुम्ही क्रिएटिव्ह क्षेत्रात असाल किंवा लेखक असाल तर डेडलाइनवर काम करण्याचे दडपण असते, पण अनेकदा आळशीपणामुळे काम वेळेवर पूर्ण होत नाही. अशा लोकांसाठी आता अशी विशेष जागा आहे जिथे तुमच्याकडून सर्व प्रोजेक्ट, असाइनमेंट पूर्ण करुन घेतल्याशिवाय सुटका होत नाही. आम्ही तुम्हाला अशा एका कॅफेबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्हाला तुमचे काम पूर्ण होईपर्यंत घरी जाऊ दिले जात नाही. यामुळे तुम्हाला दडपणाखाली तुमचे काम पूर्ण करूनच कॅफेबाहेर निघता येते. हा कॅफे नेमका कुठे आहे आणि याची खासियत आहे जाणून घेऊ.
आपली इच्छा असूनही अनेकदा आपल्या असाइमेंट्स पूर्ण होत नाही, पण या कॅफेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या असाइमेंट्स पूर्ण केल्याशिवाय जाऊ दिले जात नाही. जपानची राजधानी टोकियोच्या किओनजीमध्ये हा कॅफे सुरु करण्यात आला आहे, ज्याला अँटी प्रोक्रॅस्टिनेशन कॅफे म्हणून ओळखले जाते. येथे तुम्ही तुमचे प्रोजेक्ट, असाइमेंट्सचे टार्गेट पूर्ण करु शकता कारण या कॅफेचे कर्मचारी तुमच्याकडून ते पूर्ण करुन घेण्यासाठी दबाव टाकतात. यामुळे तुमचे टार्गेट जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला कॅफेबाहेर पडता येत नाही. या हटके कॅफेबद्दल आता सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसत आहे.
अनेकजण कामाचे टार्गेट पूर्ण करण्याच्या आशेने किंवा एखादं काम डेडलाइनमध्ये पूर्ण करण्याच्या विचाराने तासंतास कॅफेमध्ये बसतात. काहीवेळा कामाचे टार्गेट किंवा असाइनमेंट पूर्ण होते पण काहीवेळा होत नाही. पण जपानमधील या कॅफेमधून तुम्हाला काम पूर्ण झाल्याशिवाय घरी जाता येत नाही.
या कॅफेमध्ये काम करताना कोणीतरी सतत तुमच्या डोक्यावर बसले आहे याची जाणीव होते आणि ते तुमच्याकडून तुमची असाइमेंट पूर्ण करुन घेण्यासाठी प्रयत्न करतात. यात जर तुम्ही लेखक, संपादक, प्रूफरीडर, व्हिडीओग्राफर, निर्माता किंवा मंगाका (जपानी ग्राफिक डिझायनर) असाल, तर हा कॅफे तुमच्यासाठी खास आहे. कारण तुम्ही तुमचे काम पूर्ण करत नाही तोपर्यंत कॅफे तुम्हाला बाहेर जाऊ देत नाही.
हा कॅफे का आहे खास?
१) या कॅफेमध्ये पहिल्या ३० मिनिटांसाठी १५० जपानी येन (१.१५ डॉलर म्हणजे ९२ रुपये) मोजावे लागतात. नंतर प्रत्येक तासासाठी ३०० जपानी येन (२.३० डॉलर म्हणजे १८४) रुपये मोजावे लागतात.
२) एकदा का ग्राहक कॅफेमध्ये गेला की, त्यासा स्वत:ची माहिती कॅफेला द्यावी लागते. यात तुमचे नाव, प्रोजेक्टचे टार्गेट, तसेच ते टार्गेट केव्हापर्यंत पूर्ण करण्याचा विचार करत आहात त्याची कालावधी द्यावा लागतो. यानंतर takua kawai ( कॅफेचे मालक) तुम्हाला त्रास देण्यासाठी किंवा काम पूर्ण झाले की नाही हे तपासण्यास सांगू शकतात.
३) तुम्ही निश्चित केलेल्या वेळेत किंवा त्यानंतरही तुमच्या प्रोजेक्टचे टार्गेट पूर्ण झाले नाही तर हा कॅफे तुम्हाला सोडत नाही. यामुळे कॅफे बंद होईपर्यंत ग्राहकांना लक्ष्यपूर्ण काम करावे लागते.
४) या कॅफेमध्ये फक्त १० मर्यादित सीट्स आहेत.
५) या कॅफेमध्ये ग्राहकाला चहा, कॉफीची अमर्यादित सेल्फ सर्व्हिस रिफिल दिली जाते. तसेच नाश्चा देखील मिळतो.
कॅफेमध्ये ग्राहकाला आणखी काय विशेष मिळते?
हाय-स्पीड वायफाय, डॉकिंग पोर्ट, उंच खुर्च्या (ज्या तुम्हाला कामावर सरळ बसण्यास मदत करतील)
प्रोग्रेस स्टेटस चेक इन्स
ग्राहकाला कॅफेमध्ये प्रोगेस स्टेटस चेक इन पर्याय निवडावा लागतो. जर ग्राहकाने माइल्डचे ऑप्शन निवडले तर त्याला फक्त तुमचे काम पूर्ण झाले का असे विचारले जाते. पण जर तुम्ही हार्ड ऑप्शन निवडले असेल तर तुम्हाला कॅफेचे कर्मचारी समोर येऊन सतत काम पूर्ण करण्यासाठी प्रेशर करु शकतात.
अनेकांना कॅफेची ही थीम आवडली आहे. तर बरेच लोक याला मूर्खपणा असल्याचे म्हणत आहेत. पण इंटरनेटवर सध्या या कॅफेची बरीच चर्चा होत आहे.