Viral Video : पती पत्नीचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. दोन व्यक्ती एकत्र येतात आणि नव्या आयुष्याची नव्याने सुरुवात करतात. दोघेही घरकामात एकमेकांना मदत करताना दिसून येतात. सोशल मीडियावर पती पत्नीचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी ते भांडताना दिसतात तर कधी एखादे काम एकत्र करताना दिसतात. कधी एकमेकांची मजा घेताना दिसतात तर कधी भावूक होताना दिसतात.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बायकांकडे असलेल्या विशेष कलेविषयी सांगितले आहे. हा व्हिडीओ मनोरंजनासाठी तयार करण्यात आला आहे. (this art only wife know when a woman stick milk packet on a wall her husband amazed video viral)
“ही कला बायकांकडेच असते”
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पती पत्नी दिसतील. पत्नी पतीला रिकामी दुधाची पिशवी भिंतीला चिकटवण्यासाठी सांगते तेव्हा पती कात्री आणतो आणि कात्रीने पिशवी कापताना दिसतो. तेव्हा पत्नी विचारते, “काय करता हे” त्यावर पती म्हणतो, “तु म्हणालीस ना चिकटव मग माप घेतो जरा. परफेक्ट चिकटवा लागेल” त्यानंतर पत्नी म्हणते, “द्या इकडं” आणि पतीच्या हातातली रिकामी पिशवी घेऊन ती भिंतीला चिकटवते. दुधाची पिशवी भिंतीला कशी चिकटवली, असा प्रश्न पतीला पडतो आणि तो पुढे आश्चर्यचकीत होतो. या व्हिडीओवर लिहिलेय, “ही कला बायकांकडेच असते.”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
kzcreativefilms या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुमच्या बायकोकडे कुठली कला आहे??” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पिशव्या का चिकटवल्यात पण?” तर एका युजरने लिहिलेय, “आम्ही अजुनही असेच करतो ओला कचरा घालून टाकण्यासाठी” आणखी एका युजरने लिहिलेय, “या मागचं कारण मला पण अजून सापडलं नाही” अनेक युजर्सनी या व्हिडीओ वर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी त्यांच्या पत्नीला अवगत असलेल्या मजेशीर कला सांगितल्या आहेत.