आताच्या काळात योग्य जाहिरातबाजी केली तर एखाद्याची मातीही सहज विकली जाईल आणि हाच फंडा वापरून ऑस्ट्रेलियामधल्या एका विक्रेत्याने सोन्याच्या भावात खाटा विक्रीसाठी काढल्या आहेत.

डॅनिअल असं या विक्रेत्याचे नाव असून, ९९० डॉलर म्हणजे जवळपास ६४ हजार रुपयांहून अधिक किंमतीत तो एक खाट विकतो आहे. आपल्याकडे खाट म्हणजे सर्वात स्वस्त किंमतीत उपलब्ध होणारी वस्तू. ‘गरिबांचा पलंग’ म्हणून खाट ओळखली जाते. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करता करता आपल्या इथल्या शहरी लोकांनी खाटेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. पण याच पारंपरिक खाटेची डॅनिअलनं अशी काही जाहिरातबाजी केली की ही जाहिरात भारतात व्हायरल झाल्यानंतर खाटेची किंमत वाचून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला नसेल तरच नवल. डॅनिअल आयफोनपेक्षाही अधिक किंमतीत खाटेची विक्री करत आहे. ‘हे पारंपरिक भारतीय आसन असून, महागड्या पण मजबूत आणि टाकाऊ लाकडाचा वापर करून ते तयार करण्यात आलं आहे. ही खाट वापरासाठी अधिक सोयीस्कर आणि आरामदायी आहे.’ अशा एकापेक्षा एक लक्षवेधी ओळी वापरून त्याने खाटेची जाहिरात केली आहे.

वाचा : १५९ तासांचा ओव्हरटाईम केल्याने महिला पत्रकाराचा मृत्यू

वाचा : आता विश्वास ठेवायचा कोणावर? वेश बदलून फावल्या वेळेत पोलीस अधिकारी करायचा चोरी!

या खाटेच्या जाहिरातीचे फोटो भारतात व्हायरल झाल्यानंतर ट्विप्लस मात्र जबदस्त चक्रावून गेलेत. त्यामुळे डॅनिअलच्या पोस्टवर एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

https://twitter.com/AshiQuotes/status/915946928537513984

Story img Loader