Viral Video: रिक्षा ही वाहतुकीचे एक महत्त्वाचे साधन आहे. नोकरी, शाळा, कॉलेज या ठिकाणी वेळेत पोहचण्यासाठी अनेकदा आपण रिक्षाचा वापर करतो आणि प्रवास सोयीस्कर करतो. तर आज रिक्षासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तुम्ही आतापर्यंत अनेक दुचाकी,चारचाकी गाड्यांच्या अनेक स्पर्धा, शर्यत पहिल्या असतील. पण, आज तुम्हाला शर्यत तर पाहायला मिळेल. पण, ही शर्यत उलट्या दिशेने चालणाऱ्या वाहनांची असेल ; ज्यामध्ये दुचाकी आणि रिक्षा यांची एक अनोखी शर्यत ठेवण्यात आली आहे ; जे पाहून तुम्हाला नवल वाटल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, एका मोकळ्या रस्त्यावर शर्यत सुरु आहे. काही नागरिक रस्त्याकडेला उभे आहेत. व्हिडीओची सुरुवात एका दुचाकीवर बसलेल्या तरुणाच्या एंट्रीने होते. त्यानंतर व्हिडीओ जसा पुढे जातो तसं मागून एक दुचाकी चालक आणि रिक्षा स्पर्धा किंवा शर्यत लागल्याप्रमाणे एकमेकांना टक्कर देत येत असतात. ही शर्यत का इतकी व्हायरल होत आहे ? कोण या शर्यतीत जिंकत व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, दुचाकी आणि रिक्षा चालक अगदीच वेगात येत आहेत. नवल म्हणजे, दुचाकी चालक सरळ दिशेने बाईक चालवतो आहे. पण, ऑटो रिक्षा चालक उलट्या दिशेने म्हणजेच रिव्हर्समध्ये ऑटो रिक्षा घेऊन येत आहे. रिक्षा चालक, दुचाकी चालकाच्या स्पीडप्रमाणे स्वतःची ऑटो रिक्षा पळवतो आहे ; जे पाहून तेथे उपस्थित नागरिकही थक्क झाले आहेत. शर्यतीत दुचाकी चालक जिंकतो की, रिक्षा चालक या कळण्याधीच व्हिडीओचा शेवट झाला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @studentgyaan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘अनपेक्षित’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. अनेक जण ही अनोखी शर्यत पाहून थक्क झाले आहेत. तर काही जण या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावर या अनोख्या शर्यतीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि सर्वत्र रिव्हर्समध्ये रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकाचे कौतुक होत आहे.