महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडिया खूप सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांबरोबर ते नेहमी प्रेरणादायी आणि आश्चर्यकारक व्हिडीओ शेअर करत असतात. अलीकडेच भोपाळच्या स्टार्टअपचे कौतुक केले जात आहे ज्यांनी चालकाशिवाय वाहन चालवण्याचे तंत्रज्ञान (Autonomous Driving Technology)वापरले आहे. महिंद्रा बोलेरो कार वापरून त्यांनी चालकाशिवाय धावणारी एसयूव्ही कार तयार केली आहे.
महिंद्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांच्या खात्यावर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटले, “भारतभर तंत्रज्ञानाच्या नाविण्यतेचा पुरावा. एक अभियंता जो अजून एक डिलिव्हरी ॲप तयार करत नाही. लेव्हल ५ मध्ये चालकाशिवाय वाहन तयार करण्यासाठी अवघड गणित @sanjeevs_iitr वापरत आहे. मी त्याचे स्वागत करतो आणि त्याच्या कारच्या निवडीवर नक्कीच वाद घालणार नाही!”
संजीव शर्मा हे स्टार्टअप स्वायत्त रोबोट( Swaayatt Robot) आणि दीप आयगेनचे (Deep Eigen)संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्याने २०१९ मध्ये ‘ ५१ सर्वाधिक प्रभावशाली स्मार्ट सिटी लीडर्स पुरस्कार (जागतिक यादीतील)’ हा पुरस्कारही जिंकला.
हेही वाचा – सई ताम्हणकरप्रमाणे तुम्ही खाऊ शकता का आईस्क्रिम भात? विचित्र खाद्यपदार्थाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
खालील व्हिडिओ पहा:
व्हिडिओमध्ये, रस्त्यावर धावणाऱ्या बोलेरो मॉडेलच्या कारमध्ये कोणीही चालक नाही. या कारचे स्टीयरिंग व्हील आपोआप वळताना दिसत आहे त्याचबरोबर कारही रस्त्यावर वळते आहे. व्हिडीओमध्ये तंत्रज्ञानांच्या मदतीमुळे महिंद्रा बोलेरो मोकळ्या रस्त्यावर, पादचाऱ्यांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर आणि वाहनांची खूप रहदारी असलेल्या रस्त्यावर कोणत्याही अडथळ्याशिवाय कशाप्रकारे धावते आहे दाखवले आहे
महिंद्रा यांच्या पोस्टला ८२४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे तर २.२ हजार लोकांनी ही पोस्ट पुन्हा शेअर केली आहे. नेटिझन्सनी कमेंट करत या आविष्काराची प्रशंसा केली आहे. एकाने लिहिले, “यार!! भारतीय रहदारीच्या परिस्थितीत भारतीय रस्त्यांवर एक चालकाशिवाय धावणाऱ्या कारची चाचणी घेण्यात आली.”
हेही वाचा – मुंबईच्या तरुणीला हवाय नवरा; अट फक्त एकच,”पगार एक कोटी पाहिजे!” नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया चर्चेत
दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “@sanjeevs_iitr प्रयत्नांची दखल घेतली गेली याचा आनंद आहे.” तिसऱ्या वापरकर्त्याने सुचवले, “जर हे तंत्रज्ञान भारतात लागू केले गेले आणि भारतीय रस्त्यांवर यशस्वी झाले, तर ते मंगळावरही लागू केले जाऊ शकते आणि @elonmusk टेस्ला FSD विसरू शकतात.”
दुसऱ्याने लिहिले, “काही काळ या क्षेत्रात काम केल्यामुळे, मी हे उत्कृष्ट आहे असे म्हणायला हवे!! सर्व संभाव्य परिस्थितींची सांख्यिकीयदृष्ट्या नक्कल करणारा वास्तविक चाचणी ड्राइव्ह डेटा संकलित करण्यासाठी कोणालाही ४०० पेक्षा जास्त वर्षे लागतील. हे अल्गोरिदमिक वेगवान आणि उच्च दर्जाचे डेटा संकलन दर्शवते आहे.”
संजीव शर्मा यांनी पोस्टला उत्तर दिले की, “मला हे जाणून अभिमान वाटत आहे की, मोशन प्लॅनिग, रिइन्फोर्समेंट लर्निंग आणि अनिश्चित स्थितीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता असलेले हे वाहन आणि अत्याधुनिक अग्रगण्य तंत्रज्ञानाचे संशोधन@swaayatt स्वयंचलित वाहनाला अत्यंत क्लिष्ट, स्टोकेस्टिक, आणि प्रतिकूल रहदारी स्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम बनवत आहे आणि ते देखील श्री @anandmahindraj यांच्यामदतीने.”