सोशल मीडियावर विचित्र खाद्यपदार्थांचे कित्येक व्हिडीओ व्हायरल होत असतात. खाद्यपदार्थवर विविध प्रयोग करून त्याचे व्हिडीओ लोक सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. तुम्ही आतापर्यंत एका पेक्षा एक विचित्र पदार्थ पाहिले असतील. सध्या असाच एक विचित्र प्रयोग भातावर करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर निळ्या भाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. हा निळा भात लोक आवडीने खात देखील आहे.

एका फूड व्लॉगरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये पारंपारिक तूप भाताच्या रेसिपीला हटके ट्विस्ट देऊन निळ्या रंगाच्या तूप भाताची रेसिपी दाखवण्यात आली आहे. बरं, हा एक नवीन फुड ट्रेंड आहे ज्याला नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. ‘thecookingamma’ या इंस्टाग्राम वापरकर्त्या प्रतिमा प्रधान यांनी हा व्हिडीओ गेल्या आठवड्यात शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रेसिपीचे साहित्य शेअर केले आहे.

mom desi jugaad for her pet Dog
जगात भारी आईचा जुगाड! चहात बिस्कीट बुडवण्यासाठी ‘त्याचा’ हट्ट; आईने श्वानाला असं फसवलं; पाहा VIDEO
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
Ambedkar statue vandalism Ludhiana protest fact check
अमृतसरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना, निषेधार्थ हजारो लोक उतरले रस्त्यावर; मोर्चाचा VIDEO होतोय व्हायरल? पण, सत्य काय वाचा
Fried Modak Recipe
Modak Recipe : माघी गणेश जयंतीला फक्त १ वाटी गव्हाच्या पिठाचे बनवा कुरकुरीत ‘मोदक’; रेसिपी वाचा पटकन
Masale Bhaat Recipe
Masale Bhaat Recipe : घरीच बनवा लग्नसमारंभात बनवला जाणारा मसाले भात, अगदी सोपी आहे रेसिपी, पाहा VIDEO
nikki tamboli and samir choughule
Video: निक्की तांबोळी आणि समीर चौघुले यांनी सांगितली चमचमीत बटाटावड्याची रेसिपी; पाहा व्हिडीओ
Garlic Vegetable Soup recipe in marathi wniter healthy recipes
चविष्ट अन् पौष्टिक, निरोगी आरोग्यासाठी हिवाळ्यात करा गार्लिक व्हेजीटेबल सूप; ही घ्या सोपी मराठी रेसिपी

हेही वाचा – गुलाबी सायकल अन् तिच्या चेहऱ्यावरील आनंद! स्वयंपाकीण ताईचे कष्ट वाचवण्यासाठी व्यक्तीने केली खास मदत, Viral Video

ब्लू राईस साहित्य:
गोकर्म फुले – २० फुले
तूप – २ चमचे
खडा मसाला
मीठ – १ टेस्पून
बासमती तांदूळ – १ कप
पाणी – ३ कप
काजू – १०
मनुका – १०
चिरलेला कांदा – १ कप
तमालपत्र – २

या फूड व्लॉगरने गोकर्णच्या( butterfly pea flowers) फुले वापरून हा निळा भात तयार केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला महिला फुले स्वच्छ धुवून आणि पाकळ्या वेगळ्या करते. एका भांड्यात थोडे १ कप बासमती तांदूळ टाकून १५ मिनिटे झाकून ठेवते. एक भांड्यात पाणी उकळवून त्यात गोकर्णची फुले टाकते. उकळी आल्यानंतर ती फुले झाऱ्याने बाजूला काढते. भांड्यातील निळ्या पाण्यात भिजवलेला तांदूळ टाकते. भात शिजवल्यांतर त्यात तूप टाकते. दुसरे भांडे गॅसवर ठेवून त्यात थोडे तूप गरम करून त्यात मसाले, तमालपत्र, काजू, बेदाणे, चिरलेला कांदा आणि चिरलेली हिरवी मिरची टाकते. काही सेकंदांनंतर त्यात शिजवलेला निळा तांदूळ टाकते आणि परतून घेते. निळा रंगाचा भात एका ताटात वाढते.

हेही वाचा – बसमध्ये बिकिनी घालून प्रवास करणाऱ्या महिलेला पाहून ओशाळले प्रवासी; व्हिडीओ होतोय व्हायरल

व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट केल्यापासून व्हिडिओला इंस्टाग्रामवर सुमारे १५ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. पोस्टचा कमेंट सेक्शनमध्ये संमिश्र प्रतिक्रियांनी भरला होता. एका व्यक्तीने स्पष्टपणे डिश आवडली नाही असे सांगितले. तो म्हणतो की “देवा मी ते कधीही खाणार नाही.” दुसऱ्या व्यक्तीचे असेच मत होते, “त्या चमकदार निळ्या रंगाच्या भाताकडे पाहून माझी भूकच गेली.”

“हा भात खाणे गुन्हा आहे असे वाटते,” असे आणखी एकाने कमेंट केली. “रंग आणि फुलावर प्रेम करा, पण निळ्या भात बनवू नका” दुसरा म्हणाला.

हेही वाचा – Viral Video : हाय गर्मी! उन्हाचा तडाखा सहन झाला नाही म्हणून वाघीन अशा ठिकाणी जाऊन बसली की तुम्ही…

पण इतर अनेकांना ही अनोखी डिश आवडली आणि त्यांनी प्रयोगाचे कौतुक केले. “लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका, ते जांभळे होईल,” एक व्यक्ती म्हणाला. ” इतर म्हणाले, “पाककृती चांगली आहे,” “वाह.”

“मलेशियामध्ये आपणही या फुलाचा वापर करून निळा भात खातो. त्याला ‘नासी केराबू’ म्हणतात,” असे दुसऱ्या व्यक्तीने त्याचा विचार व्यक्त केला.

व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटते तुम्ही हा निळा भात खाऊ शकता का?

Story img Loader