Viral Video: आपल्यातील प्रत्येकाने रस्त्यावर झालेलं गाडी चालकांचा वाद किंवा भांडण नक्कीच पाहिलं असेल. चुकीच्या लेनमधून गाडी चालवणे, दुसऱ्या वाहनाला धडकणे, बेजबाबदार असणे, पार्किंग, ओव्हरटेक करणे आदी अनेक गोष्टी या भांडणांमध्ये पाहायला मिळतात. यापैकी कोणत्याही मुद्द्यावर रस्त्यांवर भाडं सुरु होऊ शकते हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कधीकधी भांडण इतकं वाढते की ते थेट हाणामारी पर्यंत जाऊन पोहचते. तर आज सोशल मीडियावर काहीतरी अनोखं पाहायला मिळालं आहे. यामध्ये बस आणि चारचाकी चालकाचे अगदीच प्रेमळ भांडण पाहायला मिळालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ एक कारचालक आणि कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (KSRTC) बसचा आहे. कारच्या डॅश कॅममधून हे मजेशीर दृश्य चित्रित झालं आहे. तर घडतं असं की, कार आणि बसचालक एकमेकांसमोर येण्याआधी विरुद्ध दिशेने प्रवास करत होते. दोन्ही वाहन चालक एकमेकांसमोर येताच थांबतात. एकमेकांना पुढे जाऊ न देण्यासाठी रस्त्याच्या मधोमध उभे राहतात . पण, या दोन गाड्यांव्यतिरिक्त आजूबाजूचे सर्व प्रवासी त्यांच्या गाड्या व्यवस्थित घेऊन रस्त्यावरून जाताना दिसत आहेत. एकदा पाहाच हे प्रेमळ भांडण.

हेही वाचा…रखरखत्या उन्हात कामगारांचे हाल; कष्टाला गारेगार ताकाची साथ; मदतीचा हात पुढे करणाऱ्या तरुणीचा ‘हा’ VIDEO पाहाच

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, कोणतही ट्रॅफिक जाम न करता, इतर प्रवाशांना त्रास न देता, कोणताही संवाद न साधता प्रेमळ भांडण सुरु आहे. दोन्ही गाड्यांपैकी एकही गाडी चालक स्वतःची गाडी पुढे घेऊन जात नाही आहे त्याऐवजी ते एकमेकांकडे एकटक बघत आहेत. दोन्ही चालक एक दुसऱ्याची वाट पाहत आहेत. मात्र, त्यांच्यापैकी कोणीही चालक झुकताना दिसत नाही आहे. बस ड्रायव्हर तर न डोळे मिचकावता कारचालकाकडे टक लावून पाहत आहे आणि दोघांनीही हालचाल न करण्याचा निर्णय घेतला आहे. यांची एकमेकांनकडे बघण्याची स्पर्धा सुमारे दोन मिनिटे २२ सेकंद चालली. त्यादरम्यान इतर वाहनेही त्यांना वगळून जाताना दिसली.

व्हिडीओचा शेवट होण्याआधी अवघे दोन मिनिटे शिल्लक असताना बस चालकाने पुढाकार घेतला आणि बस वाळवून तो त्याच्या दिशेने प्रवास करायला निघाला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ Reddit ॲपच्या @Go to CarsIndia या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कोणताही हॉर्न न वाजवता, कोणतेही भांडण न करता बस चालक आणि कार चालकामध्ये झालेलं हे प्रेमळ भांडण अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. एकूणच सोशल मीडियावर हा व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.