Cats Tongue Zoom In: सोशल मीडियावर हल्ली प्रत्येकी चार पैकी एक व्हिडीओ हा प्राण्यांचा असतो. त्यातही मांजरीचं वर्चस्व तर टाळताच येणार नाही. कधीही न हसणाऱ्या या मांजरी आपल्या भन्नाट व्हिडीओंनी नेटकऱ्यांना मात्र खळखळून हसवतात. मांजरीची स्वच्छता हा सुद्धा अनेकदा कौतुकाचा विषय असतो. पाण्याने आंघोळ करायला आवडत नसली तरी मांजरी स्वतःच्या जिभेने चाटून स्वतःची स्वच्छता उत्तम करतात. पण तुम्हाला माहित आहे का मांजरीची जीभ ही काही फक्त स्वच्छतेसाठी निसर्गाने केलेली सोय नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये मांजरीची जीभ अगदी जवळून दाखवण्यात आली आहे आणि हे पाहून तुमच्याही अंगावर शहारा येईल.
पशुवैद्य पीटर कार्लोसने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फुटेज शेअर केले आहे. मांजरीच्या जिभेवर लहान लहान काटे असल्याचे या व्हिडिओमध्ये सिस्ट आहे.
नॅशनल जिओग्राफिकच्या मते, हे काटे नसून ते त्वचेचाच एक भाग असतात यामुळे मांजरांना लाळ त्यांच्या त्वचेपर्यंत पोहोचवता येते. यामुळे मांजरीची त्वचा स्वच्छ राहण्यासह शरीराचे तापमान देखील कमी राहण्यास मदत होते. जॉर्जिया टेकमधील बायो इंजिनिअर डेव्हिड हू यांच्या मते, “मांजरीची जीभ अतिशय स्मार्ट कंगव्यासारखी काम करते.”
पशुवैद्य पीटर कार्लोस यांनी Instagram वर व्हिडिओ शेअर केल्यापासून, या व्हिडिओला ३५,००० हुन अधिक व्ह्यूज मिळाले आहे. कॅट्स प्रोटेक्शन संस्थेतर्फे असे सांगण्यात आले की, “या काट्यासारख्या त्वचेला पॅपिल म्हणत असून याचे विलक्षण उपयोग आहेत. यामुळे शिकार केल्यावर मांजरींना भक्ष्याच्या हाडांमधून मांस काढून खाण्यासाठी मदत होते यामुळे त्यांना मुबलक पोषण मिळवता येते. पाणी पिण्यासाठी सुद्धा या काट्यासारख्या जिभेची मांजरींना मदत होते, यामुळे मांजरींना संपूर्ण तोंड पाण्यात टाकण्यापेक्षा, फक्त जिभेने द्रव पदार्थांचे सेवन सहज करता येते.
Video: मांजरीची जीभ अशी असते, माहित होतं का?
हे ही वाचा<< डिलिव्हरी बॉयच्या नावे तुमच्याबरोबरही होऊ शकतो ‘हा’ स्कॅम! सगळे पैसे गमावून बसाल, आजच ही माहिती वाचा
विशेष म्हणजे, सिंहाच्या जिभेचा उग्रपणा पाळीव मांजरीपेक्षा जास्त असतो. अहवालानुसार, सिंहाची जीभ ५० पट जास्त काटेरी असू शकते आणि तिला स्पर्श केल्यास सॅंडपेपरला हात लावल्यासारखे वाटू शकते.