दिवसभर सोशल मीडियावर चर्चेत राहिलेल्या पाकिस्तानच्या चहावाल्यावर आता वेगळ्याच चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. या चहावाल्याचा फोटो घेऊन भारताला डिवचण्याची एकही संधी आता पाकिस्तानी नेटीझन्सने सोडली नाही.  या चहावाल्याची तूलना आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलीवूडच्या अनेक कलाकारांशी करुन तशा प्रकारचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे.
फेसबुकवर असणा-या अनेक विनोदी पेजने भारताचा चहावाला आणि पाकिस्तानचा चहावाला असे म्हणत एका बाजूला नरेंद्र मोदी आणि दुस-या बाजूला या चहावाल्याचा फोटो लावत खिल्ली उडवली आहे. तर दुसरीकडे अनेकांनी बॉलीवूडच्या कलाकारापेक्षाही आमचा चहावाला हा सगळ्यात चांगला दिसतो अशा प्रकारचे ट्विट देखील केले आहे. दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधल्या जिया अली या छायाचित्रकार तरूणीने  त्या चहावाल्याचा  फोटो आपल्या इन्स्ताग्राम अकाऊंटवर टाकला होता. पेशावर इथल्या इतवार बाजारामध्ये चहा विकणा-या या तरूणाचे नाव अरशद खान आहे. अरशदचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक पाकिस्तानी मुलींना त्याच्या  निळ्या डोळ्याने वेड लावले. इतकेच नाही तर सोशल मीडियावर विशेषत: महिला वर्गात त्याची चर्चा सुरू झाली. #chaiwala हा हॅशटॅग आणि त्याचे काही फोटो देखील ट्रेंडिगमध्ये आले. हा चहावाला आहे यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता.
पण या चहावाल्याची चर्चा पाकिस्तान काय पण येथे भारतातही रंगल्यावर पाकिस्तानी नेटीझन्सने मात्र याचा पुरेपुरे फायदा उठवत भारतीय नेटीझन्सना डिवचण्यासाठी ही संधी सोडली नाही.

91954856_chaiwala3

91954860_chaiwala6

Story img Loader