सध्या सोशल मीडियावर समोसे विकणाऱ्या एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आपल्याला नक्की आवडेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, एक मुलगा आपल्या हातात गरम कढई आणि जळता स्टोव्ह घेऊन समोसे विकत आहे. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला अथक प्रयत्न करावे लागतात हे आपल्याला या व्हिडीओमध्ये दिसून येईल.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या मुलाची मेहनत करण्याची जिद्द पाहून लोकांची मने हेलावली आहेत. हा मुलगा आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी समोस्याचे फिरते दुकान घेऊन ठिकठिकाणी फिरत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही या मुलाचे नक्कीच कौतुक कराल.
जिवंत पतीला मेलेला सांगून १० वर्ष घेत होती पेन्शनचा लाभ; जाणून घ्या कसा झाला प्रकरणाचा खुलासा
गर्लफ्रेंड्ससोबत फिरण्यासाठी चोरी करत होता बाईक; पोलिसांनी पकडल्यावर झाले असे काही…
हा व्हिडीओ फूड ब्लॉगर @youtubeswadofficial ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या मुलाच्या एका हातात एक लहान स्टोव्ह आहे, ज्यावर कढई ठेवली असून त्यात समोसे तळले जात आहेत. त्याने कंटेनर आणि गरम स्टोव्ह यांची रचना अशी केली आहे की ते उचलून कुठेही नेले जाऊ शकतात. तसेच, त्याच्या दुसऱ्या हातात एक बादली आणि समोस्यांनी भरलेली टोपलीही दिसते.
मुलगा हे सर्व सामान घेऊन एका ठिकाणी बसतो, त्यानंतर गरम तेलामध्ये हे समोसे तळतो. तो दहा रुपयांना ४ समोसे विकतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी या व्हिडीओला पसंती देत आहेत. आतापर्यंत ५ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.