जॉर्डन आणि इजिप्तच्या सीमेवर सौदी अरब एक नवं शहर वसवणार आहे. या शहराचं नाव असणार आहे निओम. अगदी हॉलिवूडच्या एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटाप्रमाणे या शहराची रचना करण्यात येणार आहे. या स्वप्नवत शहरात रोबोट सेवा देणार असून हवेत कार उडतील तर पवनचक्की आणि सोलार ऊर्जेमुळे वीजनिर्मिती केली जाईल. या शहरात फ्लाईंग टॅक्सी असतील. या शहरात फक्त बिल्डिंगच नसतील तर या शहराला स्वतःचा चंद्र आणि ढग असतील ज्यातून खराखुरा पाऊस पडेल. या शहराच्या निर्मितीसाठी जवळपास ५०० अरब डॉलर इतका खर्च येणार असल्याचं सांगितलं जातंय.

लंडनपेक्षा १७ पट मोठं असेल हे शहर

द सनच्या रिपोर्टनुसार, या हायटेक निओम शहरात २०२५ पासून लोक वास्तव्यास सुरुवात करतील. हे शहर लंडनपेक्षा जवळपास १७ पटीने मोठं असेल. निओम शहराचे चेअरमन क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे आहेत. हे शहर ड्रोनफ्रेंडली असण्यासोबतच रोबोटिक्सचं सेंटर असेल. शहराच्या नियोजन कागदपत्रांनुसार निओममध्ये फ्लाईंग टॅक्सी असतील. सौदी अरबचे प्रिन्स सलमान यांना निओमला दुबई, दोहा आणि कतारपेक्षा मोठं व्यायसायिक केंद्र बनवायचं आहे आणि या कामासाठी ते मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करण्यासही तयार आहेत. निओम शहराला हायटेक बनवण्यासाठी सौदी अरब एका पेक्षा एक उत्तम व्यावसायिकांना पाचारण करत आहे.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर

‘ती’ कवटी चोरीला गेल्याने खळबळ; १८०० सालच्या बँक दरोडा प्रकरणाशी आहे संबंध

रोबोट देणार उत्तमोत्तम सेवा

निओम शहरात रोबोटच घरातील सर्व साफसफाईची कामं करतील. सौदी अरबमध्ये पाण्याची कमतरता भासते कारण येथे पाऊस पडत नाही. परंतु निओम शहरात ही अडचण जाणवणार नाही. या शहरात क्लाउड सिडींग (Cloud Seeding) च्या मदतीने ढग बनवले जातील. त्यांच्यामुळे या शहरात खराखुरा पाऊस पडेल. याव्यतिरिक्त ‘रोबोट मार्शल आर्ट’च्या मदतीने सौदी अरब लोकांना या शहराकडे आकर्षित करण्याची तयारी करत आहे. याशिवाय या शहरासाठी एक वैयक्तिक चंद्र तयार करण्याचं सुद्धा नियोजन करण्यात आलंय, जो प्रत्येक रात्री आपल्या प्रकाशाने या शहराला प्रकाशमान करेल.

२०१७ साली करण्यात आली होती या हायटेक सिटीची घोषणा

२०१७ दरम्यान रियाडमध्ये झालेल्या ‘फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह प्रोग्रॅम’मध्ये सौदी अरबने निओम शहराची घोषणा केली होती. याच प्रसंगी बॉस्टन डायनॅमिक्सचे सीईओ मार्क रॉयबर्ट यांनी म्हटलं होतं की, महानगरांमध्ये रोबोट्सना सुरक्षेच्या कारणांसाठीही वापरले जाऊ शकते. सुरक्षा, लॉजिस्टिक, होम डिलिव्हरी, वृद्ध आणि आजारी व्यक्तींची काळजी घेणे यासारखी कामे रोबोट्स सहज करू शकतात. मार्क यांनी या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण म्हणजे निओम शहरात या गोष्टी अंमलात आणण्यासाठी एक मोठी योजना आखण्यात आली आहे. ५०० अरब डॉलरची ही योजना असून आतापर्यंत जगात कोणत्याही शहराच्या निर्मितीसाठी इतके पैसे खर्च केले गेले नाहीत.

सौदी अरबसमोर आहेत काही कठीण आव्हान

सौदी अरब ज्या शहराचे स्वप्न बघत आहे, त्याच्या निर्मितीमध्ये अडथळेही खूप आहेत. सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे ज्या हाय टेक्नॉलॉजीचा वापर करून ते रोबॉट, कृत्रिम चंद्र आणि ढग बनवण्याचा विचार करत आहेत ते कितपत सुरक्षित आहेत यावरून अद्याप विशेषज्ञ सहमत नाही आहेत. दुसरा मोठा अडथळा म्हणजे सौदी अरबमध्ये असलेले मानवाधिकार कार्यकर्ते, जे पाश्चात्य देशांच्या मोठ्या कंपन्यांना या प्रकल्पात सहभाग न नोंदवण्याचे आवाहन करत आहेत. २०१८ साली सौदी अरबवर वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खशोगी यांच्या मृत्यूचा आळ आल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर सौदी अरबची मोठी बदनामी झाली आहे. अशातच दुबई, दोहा आणि कतारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने जे नियोजन केले गेले आहे तशाच पद्धतीची प्रतिमा सौदी अरब बनवू शकेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Story img Loader