Matchmaking IT firm for Employees in Madurai : आपल्या देशात अशी एक आयटी कंपनी आहे जी कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम तर राबवत असतेच, पण सोबतच त्यांच्या परिवार नियोजनाचीही जबाबदारी सांभाळत आहे. म्हणजे ही कंपनी नेमकं काय करते हे, तुम्हाला नक्कीच समजलं नसेल. ही कंपनी आपल्या अविवाहित कर्मचाऱ्यांसाठी जीवनसाथीही शोधते. इतकेच नाही तर त्यांच्या लग्नानंतर त्यांच्या घर-संसाराची जबाबदारीही उचलते. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कर्मचाऱ्याचे लग्न झाल्यानंतर त्यांना आपल्या पगारात विशेष वाढ देखील मिळते.

एका मीडिया रिपोर्टनुसार, ग्लोबल टेक्नोलॉजी सॉल्यूशन प्रोवायडर कंपनी श्री मूकाम्बिका इंफोसोल्यूशन्स आपल्या अविवाहित कर्मचाऱ्यांना जीवनसाथी शोधण्यासाठी मदत करते. तामिळनाडूच्या मदुराई शाखेत कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना ही विशेष सुविधा देत आहे. २००६ मध्ये ही कंपनी शिवकाशी येथे सुरू झाली. यानंतर, २०१० मध्ये, कंपनीने मदुराईमध्ये आपला बेस बनवला. या कंपनीचा वार्षिक महसूल सुमारे १०० कोटी आहे.

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Should a divorced wife receive maintenance under any circumstances
घटस्फोटीत पत्नीला कोणत्याही परिस्थितीत निर्वाहनिधी मिळालाच पाहिजे का?
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
Citizens in rural areas will get property certificate thane news
ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार “मालमत्ता पत्रक “
Nagpur Mahanagarapalika Bharti 2025: total 245 vacancy available for these posts Nagpur Mahanagarpalika Bharti Form Apply
नागपूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; १ लाख २२ हजारांपर्यंत मिळणार पगार; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
Shocking video Husband took VRS due to wife's illness, wife died on the day of retirement
“नियतीचा खेळ” पत्नीच्या आजारपणामुळे लवकर रिटायरमेंट घेतली, पण निरोप समारंभातच तिने साथ सोडली; VIDEO पाहून धक्का बसेल

“कॅमेरामध्येच घुसून राहू का?” सततच्या व्हिडीओ शूटिंगला कंटाळलेल्या मुलाने वडिलांनाच धरलं धारेवर

कंपनीचे सीईओ सेल्वागणेश सांगतात की, ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना खास ऑफर देण्यावर विश्वास ठेवतात. सेल्वागणेश सांगतात की, सुरुवातीला त्यांना त्यांच्या कंपनीसाठी कर्मचारी नेमण्यात अडचणी आल्या. यानंतर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना विशेष सुविधा देण्यास सुरुवात केली. यामुळे कंपनीची कामगिरीही चांगली झाली. त्यामुळे त्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे नाते एखाद्या कुटुंबासारखे झाले. कंपनीचे कर्मचारी त्यांना आपला मोठा भाऊ मानतात.

सेल्वागणेश यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीत काम करणारे अनेक लोक दूरच्या गावातून येतात. अशा स्थितीत त्याचे आई-वडील गावात राहत असल्याने, त्यांना लग्नासाठी जोडीदार शोधण्यात अडचणी येतात. अशा परिस्थितीत ते अलायन्स मेकर्सद्वारे त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वधू-वर शोधण्यात मदत करतात. यानंतर सर्व कर्मचारी त्याच्या लग्नाला जातात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न होताच त्या कर्मचाऱ्याचा पगार वाढवला जातो.

Story img Loader