जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात चीन खालोखाल भारताचा क्रमांक लागतो. अब्जावधी लोकसंख्या असलेल्या देशांत ही दोन नावे अग्रस्थानी आहेत. पण एक असा देश आहे ज्याची लोकसंख्या फक्त आणि फक्त २७ आहे. आतापर्यंत सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश म्हणून व्हॅटीकन सिटी म्हणून ओळखला जायचा. या देशाची लोकसंख्या ८०० च्या आसपास होती. पण आता व्हॅटीकनलाही लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकत सीलँड हा स्वयंघोषीत देश पहिल्या क्रमांकावर आला आहे. दुस-या युद्धाच्या वेळी ब्रिटीश सैन्याने समुद्रात एक तात्पुरते तळ उभारले होते. त्यानंतर काही काळ या तळावर कोणाचेच वास्तव्य नव्हते. पण आता या तळावर राहणा-या लोकांनी या ठिकाणाला स्वतंत्र्य देश म्हणून घोषीत केले आहे. या स्वयंघोषीत देशाला मात्र आंतराष्ट्रीय पातळीवर मान्यता नाही.
या स्वयंघोषीत आणि २७ लोकसंख्या असलेल्या देशाचा एक स्वयंघोषीत राजाही आहे. २०१२ मध्ये मायकल बेट्स नावाच्या व्यक्तीने स्व:ताला या देशाचा राजा म्हणून घोषीत केले. नेदरलँडच्या काही लोकांनी हा देश जिंकण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी खासगी हेलिकॉप्टर वापरून बेट्स यांनी हा हल्ला परतवून लावला होता. आजही या समुद्रातून एखादी बोट फिरताना दिसली तर या बेटावर राहणारी लोक बोटीवर गोळीबार करतात. त्यामुळे याठिकाणी फारसे कोणी फिरत नाही. विशेष म्हणजे या स्वयंघोषित देशात उपजिविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नाही आहे पण जस जशी या छोट्याशा देशाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यामातून लोकांपर्यंत पोहचली तशी लोकांनी या देशाला आर्थिक मदत पुरवली आहे. सध्या फेसबुकवर या देशाचे अधिकृत पेज असून लाखो संख्येने फॉलोअर्स या पेजला आहेत. आतापर्यंत दुर्लक्षित असलेले हा देश सोशल मीडियामुळे खूपच प्रसिद्ध झाला आहे.