पोर्टलॅंड, ओरेगॉनमध्ये राहणाऱ्या जुम बॅटन नावाच्या व्यक्तीने २०१२ मध्ये वेस्ट लिन येथील त्याच्या घराबाहेर एक लक्झरी पूल बांधण्यासाठी तब्बल एक लाख दहा हजार डॉलर खर्च केले होते. एवढे पैसे खर्च करत असताना, यातून भविष्यात आपल्याला भरपूर पैसे मिळतील याची त्याला खात्री होती.

आता, या व्यक्तीने स्विम्प्ली नावाच्या प्लॅटफॉर्मद्वारे आपला स्विमिंग पूल अनोळखी लोकांना भाड्याने देऊन अवघ्या दोन वर्षांत तब्बल एक लाख ७७ हजार डॉलरची कमाई केली आहे. सीएनबीसीनुसार, बॅटनने सांगितले की सप्टेंबर २०२० पासून, त्याने स्विम्प्ली प्लॅटफॉर्मद्वारे अंदाजे ९,००० स्वीमर्सना त्याचा पूल भाड्याने दिला आहे.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Two young man drowned while fishing at Sadve in Dapoli
दापोलीतील सडवे येथे मासे पकडायला गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू
Rupee lowers as foreign investment returns to capital markets
रुपयाचा सार्वकालिक नीचांक; एक डॉलर आता ८४.११ रुपयांना
nagpur pollution increased on diwali due to use of firecrackers
प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना हवेत ,कोट्यवधींच्या फटाक्यांचा आवाज व धूर
firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner
बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार
Seaweed imports What is the use of the element What is the benefit of this decision of the central government
चक्क समुद्र शैवालाची आयात? या घटकाचा उपयोग काय? केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किती फायदा?
Should buy gold or diamond jewellery on Diwali
Money Mantra : दिवाळीत सोन्याचे की हिऱ्याचे दागिने घ्यावेत?

बॅटन त्यांचा १५,००० गॅलन क्षमतेचा पूल किमान ५ स्वीमर्ससाठी प्रति तास ७५ डॉलरच्या शुल्काने भाड्याने देतो. पाचपेक्षा जास्त असलेल्या प्रत्येक स्वीमरसाठी ते अतिरिक्त १० डॉलर प्रति तास आकारतात. पूल मध्ये जास्तीत जास्त २३ स्वीमर्स पोहू शकतात. पूल २६ X १८ फूट इतका आहे. त्याचा सर्वात कमी खोलीचा भाग ३.५ फूट खोल आहे तर पूलचा सर्वात खोल भाग ६ फूट आहे.

Viral Video : ट्रकला वाचवण्याच्या प्रयत्नात क्रेनही पडली नदीत; धक्कादायक अपघात कॅमेरात कैद

जिमने डेली मेलला सांगितले की, हा पूल दोन एकर जागेवर घरामागील अंगणात तयार केला आहे आणि त्याच्याभोवती झाडे आहेत. तापमान नियंत्रणात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आल्याने थंडीच्या वातावरणातही लोक येथे पोहू शकतात, असे या जोडप्याने म्हटले आहे. या पूलचे तापमान ९० ते १०४ अंशांपर्यंत ठेवता येते. पूल सोबतच अनेक सुविधा आहेत. येथे टॉयलेटसह एक गरम पूल हाऊस आहे. यासोबतच एक स्वतंत्र चेंजिंग रूम देखील आहे. स्विमिंग पूलसह स्पा जेट आणि बबलर्स आहेत जे रिमोट कंट्रोलने नियंत्रित केले जाऊ शकतात.

मात्र, आपल्या घराचा पूल भाड्याने देणे वाटते तितके सोपे नाही. जिम म्हणतो की, त्याने गेल्या दशकात देखभालीसाठी अंदाजे ३७ हजार डॉलर खर्च केले आहेत. पाण्यातील साफसफाई आणि त्यातील केमिकल्सची चाचणी करण्यापासून ते सर्व बुकिंग मॅनेज करण्यापर्यंत, बॅटन आणि त्याची पत्नी, लिसा बॅटन, दर आठवड्याला अंदाजे १२ ते १४ तास वेळ देतात. पाणी शुद्ध करताना ते इंटेलिकेम ऑटोमेटेड लिक्विड आणि टॅब्लेट क्लोरीन फीडर वापरतात तर जागा निर्जंतुक करण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट लाइट वापरतात.