चपाती, पोळी आणि रोटी. नावं अनेक; पण प्रकार एक. पोळ्या हा आपल्या रोजच्या जेवणातील एक महत्त्वाचा भाग असतो. महाराष्ट्रात तर पोळी-भाकरी हे मुख्य अन्न असल्यानं घरात जास्त व्यक्ती असतील, तर बऱ्याच पोळ्या कराव्या लागतात. इतर गोष्टींपेक्षा पोळ्या करायला थोडा जास्त वेळ लागतो. अगदी पीठ मळण्यापासून ते चपाती शेकण्यापर्यंतचं सर्व काही एक कौशल्याचं काम आहे. पोळी तयार करताना चपाती आकारानं गोल होईलच, असं नाही. बऱ्याचदा विविध देशांचा नकाशा तयार होतो. कधी कधी कणीक मळताना प्रमाण चुकतं किंवा पोळी लाटताना गडबड होते; ज्यामुळे चपात्या व्यवस्थित मऊ अशा होत नाहीत. पण, आता मात्र तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण- एका महिलेनं पोळ्या बनविण्याचा भन्नाट जुगाड दाखविला आहे.
पदार्थांची चव वाढविणं हा अनेक लोकांसाठी डाव्या हाताचा खेळ असतो; पण बहुतेक सर्व लोकांना पोळ्या बनविण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. गोलाकार आणि मऊ पोळ्या कशा बनवायच्या हे केवळ अनुभवी लोकांनाच माहीत असतं. पोळ्या करायला त्यांना वेळ लागत नाही आणि ते झटपट गोल व मऊ पोळ्या बनवू शकतात. अशाच एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे; जी पोळी बनविण्याच्या कलेत पारंगत आहे. जर तुम्हालाही अल्पावधीत भरपूर पोळ्या बनवायच्या असतील, तर व्हिडीओमध्ये महिलेने दाखविलेले तंत्र अवश्य फॉलो करा.
(हे ही वाचा : महिला शिक्षिकेचा वर्गात ‘या’ गाण्यावर जबरदस्त डान्स; व्हायरल VIDEO पाहून नेटकरी झाले फॅन )
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये कमी वेळेत व जास्त संख्येने पोळ्या कशा बनविता येतात हे सांगण्यात आले आहे. महिलेचे पोळी बनविण्याचे हे तंत्र लोकांना फार आवडलेले दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला पिठाचा एक मोठा गोळा घेते आणि नंतर त्याला मोठ्या आकारात लाटताना दिसत आहे. पीठ लाटल्यानंतर ही महिला वाटीच्या साह्याने चार गोल पोळ्या कापताना दिसते. त्यानंतर त्या सर्व पोळ्या एकाच तव्यावर वरच्या बाजूला ठेवून एकत्र शेकून घेताना दिसते. अशा या भन्नाट युक्तीमुळे महिला झटपट पोळ्या तयार करू शकली आहे.
येथे पाहा व्हिडिओ
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर rajput_jodi_नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिली आहे, “शाबास… ही कल्पना भारताबाहेर जाऊ नये.” या व्हिडीओची माहिती देईपर्यंत ३६ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे; तर १३ लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी व्हिडीओवर मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. तुम्हालाही या महिलेची ही भन्नाट पोळ्या बनविण्याची युक्ती कशी वाटली, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.