कुत्रा हा माणसाचा चांगला मित्र असतो. कुत्र्यासारखा इमानदार प्राणी दुसरा कोणताच नाही. आपल्याला भाकरीचा तुकडा देणा-या मालकाशी इमान राखायचे त्याला शेवटपर्यंत माहिती आहे. अशीच मालकाची आणि त्याच्या कुत्र्याची काहाणी सोशल मीडियावर फिरत आहे. चार्ली आणि त्याची मालकीण केली यांच्या प्रेमाची ही काहाणी आहे. केलीच्या कुत्र्याला ब्रेन ट्युमर झाला, त्यामुळे तो मरणासन्न अवस्थेत होता. कधीही त्याचा मृत्यू होईल अशी त्याची प्रकृती होती. पण तरीही आपल्या मालकीणीचे लग्न होईपर्यंत तो जिवंत राहिला. मालकीणीचे लग्न झाल्यानंतर मात्र त्याने प्राण सोडले.
केली १९ वर्षांची असताना तिला एका दुकानाबाहेर कुत्र्याचे पिल्लू भटकताना दिसले. तिने त्या लहान पिल्लाला घरी आणले त्याचा सांभाळ केला. कित्येक वर्ष तो केलीसोबत राहायचा. केलीचा त्या कुत्र्यावर इतका जीव होता की ती जिथे जिथे जायची तिथे तो सोबत असायचा. पण एप्रिलमध्ये त्याला ब्रेन ट्युमर झाल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे त्याचा काही दिवसातच मृत्यू होईल असे डॉक्टरने सांगितले होते. त्यामुळे केलीच्या घरातील एका कोप-यात तिचा कुत्रा फक्त झोपूनच असायचा. पण काही दिवसांत तिचे लग्न होते आणि तोपर्यंत चार्ली जिवंत राहण्याची कोणतीच चिन्हे दिसत नव्हती. पण केवळ आपल्या मालकणीचे लग्न पाहण्याची इच्छाशक्ती म्हणून की काय केलीच्या लग्नापर्यंत तो जिवंत राहिला. तिने आपल्या लग्नात कुत्र्याला जवळच ठेवले होते. पण केलीच्या लग्नानंतर मात्र त्याचा मृत्यू झाला. तिच्या लग्नातले काही फोटो हे सोशल मीडियावर फिरत आहेत. यात आपल्या आवडत्या कुत्र्यासोबतचे शेवटचे काही क्षण व्यतित करतानाचे ते फोटो आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा