सोशल मीडियावर फक्त आणि फक्त त्याचीच चर्चा सुरु आहे. जो तो त्याच्याबद्दल बोलत आहे. कोणी इण्डस्ट्रीच्या बड्या कलाकारासोबत त्याची तुलना करतोय तर कोणी जगातल्या टॉप मॉडेल्स सोबत त्याचे नाव जोडू पाहत आहे. एव्हाना तर सोशल मीडियावर #chaiwala हा हॅशटॅग देखील ट्रेंडिंगमध्ये आला आहे. खरे तर ज्याची सोशल मीडियावर त्यातूनही महिला वर्गात चर्चा सुरू आहे तो कोणी मॉडेल नाही, ना होऊ घातलेला अभिनेता आहे, तर तो आहे एक चहावाला.
पाकिस्तानमधल्या जिया अली या तरुणीने इन्स्ताग्राम अकाऊंटवरून या चहावाल्याचा फोटो शेअर केला. निळे डोळे, गोरा वर्ण, निळा शर्ट घातलेला या तरुणाचा चहा देत असतानाचा फोटो तिने सोशल मीडियावर अपलोड केला आणि अल्पावधितच पर्शिअन लूक असलेल्या या तरुणाला पाकिस्तानमधल्या जवळपास सगळ्याच महिला वर्गाला वेड लावले आहे. हा कोणी मॉडेल नसून एक चहावाला आहे यावर विश्वास ठेवायला कोणीही तयार नाही. हा फोटो इतका व्हायरल झाला आहे की सोशल मीडियावर फक्त आणि फक्त या चहावाल्याची चर्चा सुरू आहे.
काही मुलींनी तर त्याला सोशल मिडियावर लग्नाची मागणी घातली आहेत. तर अनेक जण प्रेमाचे संदेश त्याला पाठवत आहे. पेशावरच्या इतवार बाजारात चहा विकणा-या या तरुणाने देखील एका फोटोमुळे मुलींमध्ये आपण इतके प्रसिद्ध होऊ अशी कल्पना देखील केली नसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा